शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये काय झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:48 IST

जर न्याय मिळत नसेल तर जे काही करायचे ते आमच्या पातळीवर आम्ही करू असं राज ठाकरेंनी आश्वस्त केले अशी माहिती रोहित पवारांनी माध्यमांना दिली.

मुंबई - अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने चौकशी आणि FIR दाखल करण्याची मागणी करणारे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत रोहित पवारांनी विमान अपघाताबाबत असलेल्या शंका राज ठाकरेंना सांगितल्या. राज ठाकरे यांनीही रोहित पवार यांच्याकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर या भेटीत राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे २ दाखलेही रोहित पवार यांना दिले. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राज ठाकरेंना माहिती दिली. जी काही माहिती मी घेऊन गेलो ती त्यांनी समजून घेतली. FIR पोलिसांनी का घेतला नाही असं राज ठाकरेंनी विचारले. त्यांचा अभ्यास असल्याने सुप्रीम कोर्टाच्या २ निर्णयांचा दाखलाही त्यांनी दिला. अपघाती मृत्यू असला तरी FIR नोंदवता येतो हा नागरिकांचा अधिकार आहे आणि काहीही झाले तरी पोलिसांना FIR नोंदवावा लागतो असे २ दाखले त्यांनी दिले. या महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याचा असा मृत्यू होतो ज्याचा FIR घेतला जात नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असं राज ठाकरेंनी म्हटल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

तसेच याबाबतीत राज ठाकरे काय भूमिका घेतील हे येत्या काळात आपल्याला दिसेल. परंतु त्यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी सांगितल्या. दादांसोबत त्यांनी जवळून काम केले आहे.  जेव्हा वेळ मिळायचा आम्ही भेटायचो असंही राज ठाकरे यांनी सांगितले. तर दादा असो किंवा अन्य कुणी मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर जे काही करायचे ते आमच्या पातळीवर आम्ही करू असं राज ठाकरेंनी आश्वस्त केले अशी माहिती रोहित पवारांनी माध्यमांना दिली. 

दरम्यान, विमान अपघात झाला की घातपात झाला याचा तपास होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात FIR घेतला जात नाही. महाराष्ट्रात अशी घटना होत असेल तर योग्य नाही. योगायोगाने आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी माणसांसाठी राज ठाकरे सातत्याने लढत आले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातूनही कार्यकर्त्यांच्या मदतीने या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही पाठिंबा आणि ताकद द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली होती. त्यावर दादांना न्याय कसा मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असा शब्द राज ठाकरेंनी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar meets Raj Thackeray regarding Ajit Dada's plane accident.

Web Summary : Rohit Pawar met Raj Thackeray, seeking support for an FIR regarding Ajit Pawar's plane accident. Thackeray cited Supreme Court precedents, emphasizing the right to file an FIR even in accidental deaths and assured assistance to ensure justice.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAjit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना