शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 19:23 IST

Rajendra Patil-Yadravkar : मंत्री यड्रावकर हे गेल्या वर्षीही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळीही त्यांना कोगनोळी येथील टोल नाक्यावर अडवण्यात आले होते.

ठळक मुद्देपोलिसांच्या या कारवाईविरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 - बाबासो हळीज्वाळे

कोगनोळी : सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने जात असलेल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा ताफा कोगनोळी येथील टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवून परत पाठवला.

अनेक वर्षांपासून मराठी भाषिक सीमाभाग हा महाराष्ट्राशी जोडण्यात यावा, यासाठी सीमाभागातील नागरिक लढा देत आहेत. या लढ्यांमध्ये 13 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यांचा ताफा कोगनोळी येथील टोलनाक्याजवळ आला असता कर्नाटक पोलिसांनी अडवला. कर्नाटकात प्रवेश करू न देता परत पाठीमागे पाठवला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमा भागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करु. आम्ही हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले.

गेल्या वर्षीही केली होती अडवणूकमंत्री यड्रावकर हे गेल्या वर्षीही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळीही त्यांना कोगनोळी येथील टोल नाक्यावर अडवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी इतर मार्गांचा अवलंब करत बेळगाव पर्यंत पोहोचण्यात यश मिळवले होते. त्यानंतर त्यांना तिथून महाराष्ट्राच्या हद्दीत आणून सोडण्यात आले होते.

पोलिसांशी बाचाबाचीकर्नाटक शासनाच्या एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने मंत्री यड्रावकर यांना "ही आमची हद्द आहे तुमच्या हद्दीत जाऊन तुम्हाला जे काय करायचे ते करा" असे म्हटल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंत्री यड्रावकर यांची समजूत काढली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र