शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 07:04 IST

महायुती सरकारने धडाधड निर्णय घेतले; पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल, याबद्दल शंका व्यक्त करीत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता; पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राला वाचवावे लागेल. 

मुंबई : महायुती सरकारच्या कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. वांद्रे येथील हॅाटेल ताज लँड्स एंडमध्ये मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई,  आदित्य ठाकरे आदीं उपस्थित होते.

महायुती सरकारने धडाधड निर्णय घेतले; पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल, याबद्दल शंका व्यक्त करीत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता; पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राला वाचवावे लागेल. 

बाबा सिद्दीकींची हत्या होईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? या राज्यात महिला असुरक्षित, सत्ताधारी पक्षाचे नेते असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचे काय? असा सवाल ठाकरे यांनी केला. 

महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच मविआचे लक्ष्य आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

‘गद्दारांचा पंचनामा’मध्ये काय? -- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवू या- शाहू फुले आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गद्दारांना महाराष्ट्रातून हद्दपार करू या- महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार लेके बाळी सुरक्षित नाही हे महायुतीचे महापाप, चला त्यांना धडा शिकवू या- शेतमालाला हमीभाव आणि पिक विमाही मिळत नाही- शेती अवजारांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवू या- महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळून युवकांचा रोजगार हिरावून घेणाऱ्यांना जागा दाखवू या- प्रत्येक कामात ३० टक्के कमिशन घेणाऱ्या सत्ताधारी खोकेबाजांचे पितळ उघडे करू या- जाती-धर्मात भांडण लावून दंगली घडवणाऱ्या महाराष्ट्र अस्थिर करणाऱ्या सरकारला तडीपार करू या- महायुती सरकारमधील कथित रेट कार्ड : आमदार ५० कोटी, नगरसेवक १ कोटी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली १ कोटी, जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली २५ लाख असे विविध दर असल्याचा आरोप, या पंचनाम्यात महायुती सरकारमधील कथित घोटाळ्यांचीही यादी देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणMahayutiमहायुती