शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 06:39 IST

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिलेली न्यायालयीन पायाभूत सुविधा, ही देशातील सर्वोत्तमपैकी एक आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कौतुक केले, तसेच लोकशाहीच्या तीनही स्तंभांनी, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि विधिमंडळ,  नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे, कारण कोणताही स्तंभ पूर्ण क्षमतेने हे कार्य करू शकत नाही, असे मत गवई यांनी व्यक्त केले. त्यांनी गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत, वकील हा एक सामाजिक अभियंता असतो, जो सामाजिक न्यायाचे स्वप्न वास्तवात आणतो, असे सांगत, विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाचे दीपस्तंभ होण्याच आवाहन केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी  विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसचा भूमिपूजन समारंभ बुधवारी गवई यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गवई यांचा विशेष सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गवई यांना मानपत्र प्रदान करताना महाराष्ट्रातील कायदे शिक्षणाच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे सांगितले. विधि शिक्षणात प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर भर देत गवई म्हणाले की, या क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार दर्जेदार पायाभूत सुविधा  महत्त्वाच्या आहेत. देशभर फिरलो. मात्र, महाराष्ट्र सरकारने दिलेल्या न्यायालयीन पायाभूत सुविधा  देशातील एक सर्वोत्तम प्रकारच्या सुविधा आहेत, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल!

महाराष्ट्रात आता तीन राष्ट्रीय कायदा विद्यापीठे कार्यरत आहेत आणि त्यांच्या स्थापनेसाठी सरन्यायाधीश गवई यांच्या पाठिंब्याचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाला लवकरच आंतरराष्ट्रीय ओळख मिळवेल, तसेच नवी मुंबईतील ‘एज्युकिटी’ प्रकल्पात जगातील उच्च दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस उभारले जाणार असून, त्यापैकी सात विद्यापीठे पुढील दोन ते तीन वर्षांत कार्यरत होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्या. भारती डांग्रे, न्या. संदीप मारणे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे मुंबईचे कुलगुरू प्रा. दिलीप उके उपस्थित होते.

न्यायव्यवस्थेकडे ना शस्त्राचे, ना शब्दांचे सामर्थ्य!

भारतीय राज्यघटना स्वातंत्र्य, न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर आधारलेली आहे. न्यायव्यवस्थेकडे ना शस्त्राचे सामर्थ्य आहे, ना शब्दांचे, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले. कार्यकारी यंत्रणेच्या सहकार्याशिवाय न्यायालयांना आणि विधि शिक्षण संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अवघड आहे, असेही सरन्यायाधीश गवई  यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's judicial facilities best in country: Chief Justice Gavai

Web Summary : Chief Justice Gavai praised Maharashtra's judicial infrastructure as among the nation's best. He stressed collaboration between government, judiciary, and legislature for citizen welfare. Gavai highlighted lawyers as social engineers and urged students to be beacons of change at the law university campus groundbreaking.
टॅग्स :CJI BR GavaiCJI भूषण रामकृष्ण गवई