शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा इशारा; आम्ही पंतप्रधान पदाची इज्जत करतो पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 15:45 IST

Maharashtra Election 2019: पंतप्रधान पद देशाच्या इभ्रतीचं पद असून आम्ही त्याचा सन्मान करतो.

पंतप्रधान पद देशाच्या इभ्रतीचं पद असून आम्ही त्याचा सन्मान करतो. तसेच आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होऊ देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहील अशी पावले टाकली पाहिजेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नड येथील सभेत सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीआधी देशात अतिरेकी कारवाया झाल्या तेव्हा या दहशतवादी कारवायांना आळा बसावा यासाठी  देशातील सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आणि लष्कराने कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. मात्र आजचे गृहमंत्री सांगतात, की आम्ही ५६ इंचाच्या छातीने हे सर्व करून आणलं. पाकिस्तानशी दुसरं युद्ध झालं तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यावेळी भारतीय सैन्याने आपलं शौर्य दाखवून यश मिळवलं. मात्र इंदिरा गांधींनी कधी हे मी केलं, अशी प्रसिद्धी केली नाही. इंदिराजींनी कधी श्रेय घेतलं नाही पण आजचे पंतप्रधान श्रेय घेत असल्याचे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मिरची भाषा, संस्कृती वेगळी असल्याने त्यांच्या अधिकाराला संरक्षण देण्यासाठी घटनेत ३७० चे कलम आणण्यात आले. आता कलम ३७० हटवल्याने आपण तिथली जमीन खरेदी करू शकतो, हाच बदल झाला आहे. मात्र याचा गाजावाजा आजचे राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करत आहेत. परंतु नागालॅंड, मेघालय, अरूणाचल, सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्ये जमीन घ्यायचा अधिकार आपल्याला नाही, त्याचं काय.. खरंतर देशात कलम ३७० किंवा ३७१ यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा