शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 14:46 IST

मला प्रश्न पडतो, लोकसभेच्या तिकीटामागे गोंधळ कसा झाला?

शिर्डी - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अहमदनगर येथे विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो, माझे वडील मंत्री झाले. याचं सर्व श्रेय बाळासाहेब थोरातांना जातं. विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरात लावणार आहे. असा टोला अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगावला आहे.  

शिर्डी येथील सभेत बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मला प्रश्न पडतो, लोकसभेच्या तिकीटामागे गोंधळ कसा झाला? माझे वडील गेले, मी गेलो, राष्ट्रवादीकडे शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटासाठी भांडलो. त्यानंतर मी भाजपात आलो, खासदार झालो. त्यानंतर मला हळूहळू उत्तर मिळायला लागलं. त्यानंतर मला समजलं की मला लोकसभेचं तिकीट का नाकारलं गेलं? याचं कारण मी सुशिक्षित आहे. राष्ट्रवादीचं म्हणणं असेल आमच्या पक्षाकडे वाळू तस्कर आहे, डाकू आहेत मग या डॉक्टरांचा काय काम आहे. माझ्यावर एकही गुन्हा नाही, त्याने गरिबाचे पैसे खाल्ले नाहीत. तुम्ही अजिबात येऊ नका असंही त्यांनी सांगितलं. 

तसेच यापुढे राष्ट्रवादीच्या लोकांना भेटायला जायचं असेल तर जाऊ नका, कारण २ वर्ष थांबा यांची येरवडा जेलमध्ये रवानगी होईल त्यावेळी त्यांना भेटा. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना माज होता, सत्तेची गुर्मी आहे, त्यांना माहित नव्हतं की या देशात चौकीदार येणार आहे. तो तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात डॉ. सुजय विखेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला. 

दरम्यान, ईडीची केस झाली तर डोळ्यात पाणी आलं. हे डोळ्यातलं पाणी कुठे होतं जेव्हा आमच्या हक्काचं पाणी पळविले, हे पाणी कुठे होतं ज्यावेळी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला. तुमच्या पापाचा घडा भरला आहे तुम्ही सर्वजण येत्या अडीच वर्षात जेलमध्ये जाणार आहे असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना दिला आहे.  

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019