शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना पाच वर्षांत १५ हजार कोटींची कर्जमाफी : स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:52 IST

मागील पाच वर्षांत ६५ हजार शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल झाल्या आहेत.

ठळक मुद्देभाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी निमगाव केतकी येथे सभा राष्ट्रवादी व्हेंटिलेटरवर

इंंदापूर : ‘‘जर जनतेने राष्ट्रवादी व काँग्रेसला मतदान केले तर पदरात काहीही पडणार नाही. भाजपला मतदान करून लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना पाच वर्षांत ५० लाख शेतकऱ्यांना १५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी भाजप सरकारने करून दिली आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केले. 

इंदापूर तालुक्यातील भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे आयोजित जाहीर सभेत केंद्रीयमंत्री  इराणी बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, की भारत देशात लोडशेडिंग नाही, वीज जात नाही. त्यामुळे मुबलक वीजपुरवठा होत असल्याने जीवनातील अंधार संपुष्टात आला आहे. रोजगार मिळण्यासाठी राज्यात पहिली गरज वीज आहे, त्यानंतर शिक्षण आहे. मागील पाच वर्षांत ६५ हजार शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल झाल्या आहेत. हा सन्मान फक्त भाजप सरकारचा आहे.........राष्ट्रवादी व्हेंटिलेटरवरराज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले, की हर्षवर्धन पाटलांबद्दल तसा मला रागच आहे, याचे कारण असे आहे, की लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मी पाच फोन केले होते. मात्र, त्यांनी ‘रिस्पॉन्स’ दिला नाही. त्या कालावधीत जर हर्षवर्धन पाटील भाजपकडे आले असते, तर लोकसभेचा निकाल वेगळा लागला असता. मोदी सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, काँग्रेस पक्षाची वाईट अवस्था झाली आहे. सभा करायला काँग्रेसचा एकही नेता राहिलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटका मोजत आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

 

टॅग्स :Indapurइंदापूरindapur-acइंदापूरBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी