शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 08:56 IST

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाभरातून तब्बल एक लाख लोकांची सभेला उपस्थिती असेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला असून, उन्हाच्या झळांपासून रक्षण होण्यासाठी सभास्थळी तब्बल सहा भव्य डोमची उभारणी करण्यात येत आहे.प्रत्येक डोममध्ये सुमारे १५ हजार खुर्च्यांची व्यवस्था असणार आहे. सहाही डोममध्ये सुमारे एक लाख लोक बसतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये महायुतीने १४ उमेदवार दिले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात येत आहेत. धुळे येथील सभा सकाळच्या सत्रात आटोपल्यानंतर दुपारी नाशिकमधील पंचवटीतील तपोवनातील मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.धुळ्यातील सभा आटोपल्यानंतर मोदींचे हेलिकॉप्टर नाशिकला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नीलगिरी बागेतील हेलिपॅड येथे उतरेल. तेथून मोटारीने ते तपोवनातील सभास्थळाकडे येतील. 

या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, अमर साबळे, मंत्री गिरीश महाजन आदींसह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व १४ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तब्बल एक लाखाहून अधिक लोक या सभेला उपस्थित राहतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकDhuleधुळेMahayutiमहायुतीBJPभाजपा