शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जावीत! नाना पटोलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 05:51 IST

कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले; पटोलेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

मुंबई : कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले आहे. टीका सहन करून कठोर निर्णय घेतले, याचे कौतुक आहे; परंतु आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. ती द्यायला हवीत, अशी टिपणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्रिपदही सांभाळले होते. ते खाते वापरण्यात आणि प्रशासन चालविण्यात ते ‘एक्सपर्ट’ आहेत, अशी पाठ थोपटतानाच, काही घरं सोडायची असतात, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला.‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी नाना पटोलेंशी संवाद साधला. त्यावेळी नानांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली. “माझ्या घरात कुणी राजकारणी नाही. जानेवारी १९९२ मध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडे तिकीट मागितले होते, पण त्यांनी दिले नाही. घरातूनही कुठली मदत झाली नाही. तरीही मी रिंगणात उतरलो आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकलो. त्यावेळी भ्रष्टाचाराविरोधात काम करायचे. संस्था, कारखाने काढायचे नाहीत, असे वडिलांनी बजावले होते. हा मंत्र आज माझ्या कामाला आला, असे नाना प्रांजळपणे म्हणाले.निधीसाठी भांडावं! बाळासाहेब थोरात सरळ व्यक्तिमत्त्व आहे. कुणाचं मन आपल्यामुळे दुखावलं जाऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो; पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो, असा आरोप आहे. काँग्रेस आमदारांना निधीचे वाटप कमी होते. काँग्रेसच्या हिश्श्याचे जे काही आहे ते मिळाले पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या आमदाराला जास्त निधी मिळेल यासाठी भांडावे, अशी सूचना पटोलेंनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे