शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:40 IST

Bhaskar Jadhav: तिन्ही पक्षांना मिळूनही एवढा आकडा होत नाहीय की विरोधी पक्षनेते पद मिळेल. यावर आता जाधवांचे वक्तव्य आले आहे. 

दीड वर्षांपूर्वी विधानसभेत बोलू दिले जात नाही, असे म्हणत हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, असे सांगत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडत निघून गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे  आमदार भास्कर जाधव यांच्याकडे ठाकरे गटाचे गटनेतेपद आले आहे. मविआमध्ये ठाकरे गट सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. परंतू, या तिन्ही पक्षांना मिळूनही एवढा आकडा होत नाहीय की विरोधी पक्षनेते पद मिळेल. यावर आता जाधवांचे वक्तव्य आले आहे. 

नवीन सरकार स्थापन झाले की आम्ही विरोधी पक्षनेते पदाची मागणी करणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. माझी गटनेते पदी निवड झाली हे अनपेक्षित आहे, स्वत: लाही माझी निवड व्हावी असे वाटत नव्हते. तुम्ही आणि संबंध महाराष्ट्र माझे अभिनंदन करत आहे असे समजून आभार मानतो, असे जाधव म्हणाले. 

मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे. मी मुंबईत राहणारा माणूस नाही. मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मंत्रालयात जाणे- येणे सोयीच ठरते. त्यामुळे ही निवड मुंबईमध्ये राहणाऱ्या एका जेष्ठ नेत्याची व्हावी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाचा मी आग्रह धरला होता. पण अध्यक्षांनी माझी निवड केली. तसा आदेश दिला त्यामुळे तो मी स्वीकारला असल्याचे जाधव म्हणाले.  

शपथ विधी झाल्यानंतर आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की सरकारकडे विरोधीपक्षनेते पद मिळावे याची मागणी करणार असल्याचे जाधव म्हणाले. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे