शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ईडी लावली, तर मी सीडी लावतो! खडसेंचा भाजपला गर्भित इशारा; पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा शुक्रवारी पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा गमच्या देऊन त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देदुप्पट निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करून दाखवणारनाथाभाऊ काय चीज आहेत हे आता दिसेल मला दिल्लीतील नेत्यांनीच सांगितले भाजप सोडून जा!

मुंबई : भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपला टिकेचे लक्ष्य केले. ‘तुम्ही माझ्याविरुद्ध ईडीची चौकशी लावली तर, मी तुमच्या कृत्यांची सीडी लावतो. मी कोणताही भूखंड घेतलेला नसताना माझ्याविरूद्ध षडयंत्र रचून मला बदनाम केले गेले. आता थोडे दिवस थांबा, कोणी किती भूखंड; नियम डावलून घेतले हे मी दाखवतो, असा गर्भित इशाराही खडसे यांनी भाजप नेतृत्वाला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा शुक्रवारी पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा गमच्या देऊन त्यांचे स्वागत केले.  यावेळी खडसे म्हणाले, मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही, असे आपले दु:ख व्यक्त करताना खडसे म्हणाले, मला जयंत पाटील यांनी विचारले होते की, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात तर तुमच्या मागे ईडीची चौकशी लावली जाईल. तेव्हा काय कराल? मी म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन!  खडसे यांचा गर्भित इशारा उपस्थितांना कळाल्यामुळे जोरदार हशा पिकला. शरद पवार यांनाही आपले हसू लपवता आले नाही. 

अजित पवार नाराज नाहीतमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांवरून बोलताना पवार म्हणाले, अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या मी कालपासून पहात आहे. असे काहीही नाही. अनेकांना कोरोनाची लागण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून ते घरी थांबले आहेत.  तसेच खडसे हे कोणत्याही पदाच्या लालसेने पक्षात आलेले नाहीत, असे पवारांनी सांगितले.

नाथाभाऊ काय चीज आहेत हे आता दिसेल धुळे, जळगाव, नंदुरबार अशा खानदेशात नव्या पिढीला उभे करून काँग्रेस कमकुवत करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यामुळे या भागात काँग्रेसला उतरती कळा लागली. मात्र आता तेच खडसे राष्ट्रवादी मध्ये आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. त्यावर माझा ठाम विश्वास आहे. एकनिष्ठेने ते काम करतील. नाथाभाऊ काय चीज आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी  खडसे यांचे पक्षात स्वागत केले. 

मला दिल्लीतील नेत्यांनीच सांगितले भाजप सोडून जा! -जेव्हा मी दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना, मी काय करु? असे विचारले, तेव्हा त्यांनी मला भाजपमध्ये तुम्हाला भवितव्य नाही, तुम्ही भाजप सोडून जा, असे मला सांगितले. मी कोणत्या पक्षात जाऊ? असेही त्यांना विचारले, तेव्हा मला राष्ट्रवादी पक्षात जा असे सांगण्यात आले, हा प्रसंग आपण नावानिशी शरद पवार यांना सांगितला होता, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी यावेळी केला. त्यामुळे ते नेते कोण आहे ही नवी चर्चा आता सुरू झाली आहे. 

दुप्पट निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करून दाखवणार -चाळीस वर्षात मी भाजपची सेवा केली. दगड धोंडे खाल्ले. मात्र सत्ता आल्यानंतर यांनी मला अँटीकरप्शनच्या कार्यालयात खेटे मारायला लावले. माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम केले. मात्र आता जेवढ्या निष्ठेने मी भाजपचे काम केले होते, त्याच्या दुप्पट निष्ठेने मी राष्ट्रवादी चे काम करून पक्ष वाढवून दाखवीन. मी कोणालाही घाबरणार नाही अशा शब्दात खडसे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार