शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅग स्कॅन झाला नाही तर प्रवास होणार फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 12:01 IST

रोखीने पैसे घेतल्यानंतर काही वेळा फास्टॅग खात्यातूनही टोलचे पैसे गेल्याचा संदेश

ठळक मुद्देपुणे-सातारा महामार्ग : केंद्र सरकारसह टोल व्यवस्थापनाने केली नाही जनजागृती  रोखीने पैसे घेत असल्याच्या तक्रारी 

पुणे : राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवर फास्टॅग स्कॅन न झाल्यास वाहनचालकांना पैसे भरावे लागणार नाहीत. केंद्र सरकारच्या अधिसूचनेमध्येच हे स्पष्ट केले आहे. पण केंद्र सरकारसह टोल व्यवस्थापनाकडूनही याबाबत जनजागृती केली नाही. त्यामुळे फास्टॅग असूनही रोखीने पैसे घेतले जात असल्याची चालकांच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ७ मे २०१८ रोजी काढलेल्या अधिसूचनेमध्ये याबाबत स्पष्ट केले आहे. कोणत्याही वाहनाच्या फास्टॅग खात्यामध्ये पुरेसे पैसे असूनही फास्टॅग स्कॅन झाला नाही तर संबंधितांकडून पैसे घेऊ नये. त्यांना टोलचे पैसे द्यावे लागणार नाहीत, असे त्यामध्ये स्पष्ट केले आहे. पण अद्याप याबाबत वाहनचालकांना माहिती दिलेली नव्हती. फास्टॅग बंधनकारक करण्याबाबत मंत्रालयाकडून नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना टोल व्यवस्थापनाला दिल्या जात असताना या सवलतींबाबत मात्र माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे टोलनाक्यांवर फास्टॅग स्कॅन न होऊनही वाहनचालकांकडून रोखीने पैसे घेतले जात असल्याचा तक्रारी येत आहेत. रोखीने पैसे घेतल्यानंतर काही वेळा फास्टॅग खात्यातूनही टोलचे पैसे गेल्याचा संदेश वाहनचालकांना येत आहे. याबाबत टोल व्यवस्थापनाकडून मात्र नकार दिला जात आहे. दु्रतगती मार्गावरील टोल व्यवस्थापनाकडून दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर काही वर्षांपासून फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे ही यंत्रणा पुरेशी सक्षम आहे. फास्टॅग खात्यात पुरेशी रक्कम नसेल तरच फास्टॅग ब्लॅक लिस्ट दाखविला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून रोखीने पैसे घ्यावे लागतात. फास्टॅग रीड होत नाही, अशा घटना घडतच नाहीत. त्यामुळे टोल न घेण्याचा प्रश्नच येत नाही. खेड-शिवापूर टोल व्यवस्थपानाकडूनही हेच उत्तर देण्यात आले. मोफत प्रवासाबाबतचा शासन निर्णय केंद्र सरकारने काढावा, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे बाबा शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, द्रुतगती मार्गावर फास्टॅगचे कोणतेही बंधन नाही, असे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. ..........

दुप्पट टोलवसुली सुरूराष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग लेनमधून विना फास्टॅग वाहनांनी प्रवेश केल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोलवसुली करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-सातारा महामार्गावर ही वसुली दोन दिवसांपासून केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना फास्टॅग लेनमधील घुसखोरी महागात पडत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जानेवारीपासून फास्टॅगची अंमलबजावणी काटेकोरपणेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार टोल व्यवस्थापनाकडून टोलवसुली केली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर जाताना नऊ व येताना नऊ लेन आहेत. या लेनपैकी प्रत्येकी दोन लेन फास्टॅग व रोखीने टोल भरणा करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. उर्वरित लेनमधून केवळ फास्टॅग असलेल्या वाहनांनाच प्रवेश आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांनी या लेनमधून प्रवेश केल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल घेण्याबाबत केंद्र सरकारचीच अधिसूचना आहे. त्यानुसार त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जात असल्याची माहिती टोल व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिली. द्रुतगतीवर मात्र दुप्पट टोलवसुली केली जात नाही. या मार्गावरील सर्व लेन हायब्रीड आहेत, अशी माहिती टोल व्यवस्थापनाकडून देण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकारtollplazaटोलनाकाfour wheelerफोर व्हीलर