शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

घोलप, हळवणकरांची आमदारकी धोक्यात

By admin | Updated: July 17, 2014 02:44 IST

न्यायालयाने शिक्षा सुनावलेले शिवसेनेचे देवळाली येथील आमदार बबन घोलप आणि इचलकरंजीचे भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांची आमदारकी धोक्यात आली

मुंबई : न्यायालयाने शिक्षा सुनावलेले शिवसेनेचे देवळाली येथील आमदार बबन घोलप आणि इचलकरंजीचे भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांची आमदारकी धोक्यात आली असून, त्यामुळे त्यांना ९ वर्षे कोणतीही निवडणूक लढता येणार नाही. दोघांचेही सदस्यत्व रद्द करावे, असे मत निवडणूक आयोगाने राज्यपालांना दिल्यामुळे राज्यपाल कुठल्याही क्षणी तसा आदेश काढू शकतात.
विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले, की या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील प्रकरण महाधिवक्ता यांचे मत घेऊन विधिमंडळ सचिवालयाने राज्यपालांकडे पाठविले होते. राज्यपालांनी त्यावर निवडणूक आयोगाचे मत मागविले होते. दोघांचे सदस्यत्व घटनेच्या कलम १९१, १९२ नुसार रद्द करावे, असे मत आयोगाने दिले आहे. सदस्यत्व रद्द करण्यासंबंधीचा राज्यपालांचा आदेश येत्या एक-दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देऊन राज्यात सत्तेत येऊ पाहात असलेल्या महायुतीला हा धक्का आहे. दोन्ही काँग्रेसला यानिमित्ताने युतीची कोंडी करण्याची संधी मिळेल.
घोलपांचे काय आहे प्रकरण ?
सेनेचे आमदार घोलपांवर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने त्यांना तीन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व त्यांना ३ वर्षांची शिक्षा झाल्यापासून म्हणजे २० मार्च २०१४ पासून रद्द केले जाणार आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सहा वर्षे म्हणजे मार्च २०२३ पर्यंत त्यांना निवडणूक लढता येणार नाही.
हळवणकरांना वीजचोरी भोवली!
हळवणकर यांचा कोरची (ता.हातकणंगले) येथे भागीदारीत यंत्रमाग कारखाना असून, तेथे वीजचोरी केल्याप्रकरणी इचलकरंजीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षे कैदेची शिक्षा ३ मे २०१४ रोजी सुनावली होती. या विरुद्ध त्यांनी केलेले अपील दाखल करून घेताना उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, मात्र त्यांना दोषी ठरविण्याचा निकाल स्थगित केलेला नाही. त्यांनाही २०२३ पर्यंत कोणतीही निवडणूक लढता येणार नाही.