शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर स्मारक जाळपोळ प्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: June 14, 2014 04:48 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतील स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक

सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतील स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना आज (शुक्रवार) दुपारी यश आले. उगारखुर्द (ता. अथणी) येथे चौघांना पकडण्यात आले. येथील गावभागातील अमरधाम स्मशानभूमीजवळ चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. संशयितांनी खोडसाळपणाने स्मारकात जाळपोळ केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्यांमध्ये नितेश दिलीप व्हराळे ( २२), अमनदीप राजेंद्र कांबळे (२५), किरण पंडित बेळकुंडे (२२, हरिपूर रस्ता) व प्रीतम दिनकर जयकर (२२) यांचा समावेश आहे. त्यांना उद्या (शनिवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. चार दिवसांपूर्वी (सोमवार) अमरधाम स्मशानभूमीजवळील कट्ट्यावर रात्री जेवण केल्यानंतर चौघेजण गप्पा मारत बसले होते. त्यांच्यात फेसबुकवर राष्ट्रपुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचा विषय निघाला. त्यावेळी जयकरने आपणही या घटनेचा निषेध करण्यासाठी एसटी बस फोडल्या पाहिजेत, यासाठी कोल्हापूर रस्त्यावर जाऊया, असे सुचविले. त्यावेळी अन्य तिघांनी, एवढ्या लांब कशाला, जवळच असलेल्या बाबाराव स्मारकात जाळपोळ करू, असे सांगितले. चौघांचे एकमत झाल्यानंतर साडेअकराला ते स्मारकाबाहेर जाऊन बसले. साडेबाराला दरवाजाचे कुलूप तोडून आत गेले. सुरुवातीला स्मारकाच्या सभागृहातील सोफासेट पेटविला. त्यानंतर पुस्तकांची खोली पेटवून दिली. या जाळपोळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह दुर्मिळ ग्रंथ-पुस्तके, सावरकरांचे वैचारिक वाङ्मय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचार पुस्तके अशी दीड हजारावर गं्रथसंपदा जळून खाक होऊन दोन लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेचा बाबाराव सावरकर स्मारक विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना व संघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीसप्रमुख सावंत यांच्याकडे केली होती. या प्रकरणी राज्यभरात सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)