"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 21:33 IST2026-01-18T21:30:41+5:302026-01-18T21:33:21+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांचे झ्युरिक येथे उत्साह आणि जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या याच स्वागताचा फोटो शेअर करत खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे.

"Fadnavis' journey to the highest office in Delhi seems to have begun", making a big statement while sharing photos of Sanjay Raut | "फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान

"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान

Devendra Fadnavis in Davos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसीय स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर आहेत. स्वित्झर्लंडमध्ये दावोस समिट २०२६ होत असून, रविवारी झ्युरिक येथे दाखल झाले. यावेळी त्यांचे जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. फडणवीस यांच्या स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केले. "फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", असे खासदार राऊत म्हणाले आहेत. 

स्वित्झर्लंडमध्ये होत असलेल्या 'दावोस समिट 2026'साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. रविवारी (१८ जानेवारी) त्यांचे झ्युरिक येथील विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रीय समुदायाकडून पारंपरिक पद्धतीने यांचे स्वागत करण्यात आले. 

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झ्युरिक येथील स्वागताचा खासदार संजय राऊत यांनी फोटो पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

खासदार राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक येथे करण्यात आले, ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे", अशा भावना राऊतांनी व्यक्त केल्या आहेत. 

पुढे राऊतांनी लिहिले आहे, "महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय!"

स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या दावोस येथे 17 ते 24 जानेवारीदरम्यान जागतिक आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी जगभरातील विविध देशांमधील, राज्यांतील प्रतिनिधींबरोबरच मोठमोठ्या नामांकित कंपन्यांही सहभागी होणार आहेत.

Web Title : फडणवीस की दिल्ली के शीर्ष पद की यात्रा शुरू: संजय राउत का बड़ा बयान।

Web Summary : देवेंद्र फडणवीस की दावोस यात्रा से अटकलें तेज। संजय राउत का कहना है कि ज्यूरिख में भव्य स्वागत से प्रभावित होकर दिल्ली में शीर्ष पद की उनकी यात्रा शुरू हो गई है।

Web Title : Fadnavis's journey for top Delhi post begins: Sanjay Raut's big statement.

Web Summary : Devendra Fadnavis's Davos visit sparks speculation. Sanjay Raut suggests his journey towards a top position in Delhi has started, impressed by the grand welcome in Zurich.