शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार बडोले भाजपातून अजितदादा गटात; सेटिंगमुळे विद्यमान आमदाराचा पत्ता होणार कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:35 IST

राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत येथील पक्ष कार्यालयात हा प्रवेश पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघांतील भाजपचे माजी आमदार, मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत येथील पक्ष कार्यालयात हा प्रवेश पार पडला.

महायुतीत अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे गेल्यावेळी केवळ ७०० मतांनी पराभूत झालेल्या बडोलेंचे काय, असा प्रश्न होता. मात्र, या दोन पक्षांतील सहमतीने बडोलेंनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी पक्की केली. या प्रवेशाने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले. बडोलेंचा मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे यांनी पराभव केला होता. मात्र, पाच वर्षांत त्यांच्याबाबत मतदारसंघात असलेली नाराजी पाहता अजित पवार यांनी चंद्रिकापुरे यांना उमेदवारीस नकार दिला.

हा मतदारसंघ सोडायला अजित पवार तयार नव्हते. त्यामुळे भाजपने बडोले यांना उमेदवारीसाठी अजित पवार गटात पाठवले. मित्रपक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच बडोले यांना प्रवेश दिल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पहिल्या दिवशी ५७ उमेदवारांचे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी राज्यात ५७ उमेदवारांनी ५८ अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावRajkumar Badoleराजकुमार बडोलेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारVidarbhaविदर्भ