शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांना शिवभोजन थाळी, NCP-काँग्रेसला मोठमोठी पदं दिली”; शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:29 IST

Maharashtra Political Crisis: तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही शिवसैनिकाला लाचार व्हायला लावले, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील खासदाराने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे.  दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्षही तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, राज्यभरातून एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना दिसत आहे. यातच आता शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

किती दिवस लोकांच्या तोंडाकडे बघायचे? लोकांकडे वर्गणी मागायची. आमच्या वर्गण्यांची संभावना तुम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादी) खंडणी म्हणून केली. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही आम्हाला लाचार व्हायला लावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तोंडाकडे आम्हाला बघायला लावले. ही लाचारी आम्हाला मान्य नव्हती, असा हल्लाबोल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला. 

स्वाभिमान दुखावण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने केले

आम्ही १९९५ चे युती सरकार बघितले. त्यावेळी शिवसेनेने १ रुपयात झुणका भाकर विकायला लावली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आले. १० रुपयांत तुम्ही शिवभोजन थाळी विकायला लावली. एकीकडे राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालये देत आहेत, मोठी पदे देत आहेत आणि माझा शिवसैनिक एक रुपयात झुणका भाकर विकतोय. १० रुपयांत शिवभोजन थाळी विकतोय. त्याचा स्वाभिमान दुखावण्याचे काम या मागच्या सरकारने केले, असा गंभीर आरोप हेमंत पाटील यांनी केला. 

तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती

तुम्हाला कुठेतरी पदावर बसायचे होते. तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. तुम्हाला सत्ता भूषवायची होती. म्हणून ज्या लोकांनी ३५-३७ वर्षे आमच्यावर अत्याचार केले. त्यांना तुम्ही जवळ करून बसलात. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला आणि आमचे निर्दालन केले. कुठचे पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वमान्यांना न्याय नव्हता, असा घणाघात हेमंत पाटील यांनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे कशाप्रकारचा घडलेला माणूस आहे. दररोज २०-२० तास काम करतात. कधी मास्क नाही. कुणी हात पुढे केला तर लगेच हात मिळवतात. कुठलीही अस्पृश्यता बाळगत नाही, असे म्हणत हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले.
 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळHemant Patilहेमंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे