शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:21 IST

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

Disha Salian Case:शिवसेना(उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाची हत्या किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करुन,  या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला होता. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या वर्षी मार्चमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करावी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केली होती. 

दिशावर कुठल्याही प्रकारचा अत्याचर नाही
मात्र, दिशा सालियनने स्वतःच्या इच्छेने फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली होती. पोस्टमॉर्टम अहवालात तिच्यावर लैंगिक किंवा शारीरिक हल्ल्याचे कोणतेही चिन्ह नसल्याचे पोलिसांनी उच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. कुटुंबाशी झालेल्या वादामुळे आणि तिचे व्यवसायिक व्यवहार व्यवस्थित होत नसल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

याप्रकरणी तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण झालेली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असून, त्यात कोणताही घातपाच किंवा हत्येचा प्रयत्न झाल्याचं आढळून आले नाही. म्हणून दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टाकडे केली आहे.

फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीनचीन मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा क्लिन चिट रिपोर्ट आला आहे. हे पोलिस आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही ती तुम्हीच स्थापन केली होती. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगले काम केले. त्यांचे नेतृत्व खच्ची करण्याचे काम केले. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे, इतर भाजप नेते, एकनाथ शिंदे, या सर्वांनी शिवसेना (यूबीटी) आणि आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCourtन्यायालय