शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

घाईघाईत शपथविधी का उरकला?; फडणवीसांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 21:17 IST

फडणवीसांनी सकाळी लवकर उरकलेल्या शपथविधीवर बरीच टीका झाली होती

मुंबई: पहाटे उठवलेली राष्ट्रपती राजवट आणि सकाळीच उरकलेला शपथविधी यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. इतक्या घाईघाईत शपथविधी उरकायची गरज काय होती, असा प्रश्न त्यावेळी विरोधकांनी फडणवीसांना विचारला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्यानं घाईघाईत शपथविधी केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शिवसेनेनं आधीपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याची तयारी केली होती. मात्र तरीही आम्ही महिनाभर शांत होतो. त्यानंतर अजित पवार आमच्याकडे आले. तीन पक्षांचं सरकार चालवणं कठीण असल्याचं राष्ट्रवादीतल्या अनेक आमदारांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थिर सरकारसाठी पक्षानं भाजपासोबत जावं, असा मतप्रवाह असल्याचं ते म्हणाले. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रदेखील दिलं. अजित पवारांनी दिलेलं पत्र राष्ट्रपतींकडे गेल्यावरच राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली, अशा शब्दांत फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर मी आणि अजित पवारांनी तात्काळ शपथ घेतली. कारण राष्ट्रपती राजवट हटल्यावर राज्यपालांचे अधिकार संपतात आणि त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री नसतो. राज्यात सरकारच नसल्यानं पोकळी निर्माण होते. त्यामुळेच आम्ही सकाळीच शपथविधी उरकला, असं फडणवीस म्हणाले. हा आमचा गनिमी कावा होता, कारण सर्वांनी आम्हाला बाजूला टाकलं होतं. कदाचित आमचा गनिमी फसला असेल. आम्ही उचलेलं पाऊल कदाचित योग्य असेल किंवा अयोग्य नसेल. यावरही चर्चा होऊ शकते, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा