शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन सीईओसह लेखाधिकाऱ्यावर गुन्हे

By admin | Updated: July 18, 2014 00:56 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अकोल्याचे विद्यमान जिल्हाधिकारी अरुण शिंदे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन वर्ग एक लेखाधिकारी अविनाश गंगाधर जोशी

भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे प्रकरण : न्यायालयाच्या निर्देशावरून झाली कारवाई
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अकोल्याचे विद्यमान जिल्हाधिकारी अरुण शिंदे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन वर्ग एक लेखाधिकारी अविनाश गंगाधर जोशी यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील कथित भ्र्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपावरून आणि त्यासंदर्भात झालेल्या तक्रारींवरून हे प्रकरण घडले आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शिंदे यांनी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर, कार्यकारी अभियंता भूषण मून, कोरपना उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांच्यासह कनिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदर अशा आठ जणांवर शासकीय फाईलमध्ये बेकायदेशिररीत्या बदल केल्याचा व त्यासाठी खोटी कागदपत्रे जोडल्याचा आरोप करून त्यांची चौकशी सुरु केली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन लेखाधिकारी अविनाश जोशी यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र आपल्यावरील आरोप खोटे असून चौकशीही पूर्वग्रहदूषितपणे झाल्याचा आरोप या आठही जणांनी केला होता.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य विनोद अहीरकर यांच्याशीही शिंदे यांचे संबंध कमालीचे दुरावले होते. अहीरकर यांनी अरुण शिंदे यांच्या संदर्भात माहितीच्या अधिकारात विविध माहिती गोळा करून २१ प्रकरणांमध्ये अनियमितता केल्याची तक्रार शासनाकडे केली होती. यात लक्षावधी रुपयांची खरेदी, नियमबाह्य आदेश देणे आदी आरोपांचा समावेश होता. या तक्रारीची शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याचे बघून जिल्हा परिषदेने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. तो पारित झाल्यावर काही काळाने अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली होती.
दरम्यानच्या काळात निवृत्त झाल्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण मून यांनी चंद्रपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अरुण शिंदे यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले होते. त्यावर निर्णय होऊन अरुण शिंदे आणि लेखाधिकारी अविनाश जोशी यांच्याविरुद्ध कलम ४०८, ४६८, ४७१, ४७७, १२० अणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश रामनगर पोलिसांना दिले होते. मात्र पोलिसांनी दखल घेतली नव्हती. यामुळे मून यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन ही परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने नव्याने दिलेल्या निर्णयानुसार गुरुवारी दुपारी रामनगर पोलिसांत दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. सध्या भूषण मून आणि वर्ग एक लेखाधिकारी अविनाश जोशी सेवानिवृत्त झाले आहेत. अरुण शिंदे अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर, प्रभू राजगडकर गडचिरोली जिल्ह्यात सेवारत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)