शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू

By admin | Updated: February 12, 2015 04:14 IST

तालुक्यातील ग्रामीण परिसरात गोदामाच्या नावाखाली तर काही गोदाम परिसरात विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे

भिवंडी : तालुक्यातील ग्रामीण परिसरात गोदामाच्या नावाखाली तर काही गोदाम परिसरात विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे बनविण्यात येणाऱ्या वेल्डिंग रॉडच्या कंपनीत बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास स्फोट होऊन लागलेल्या आगीत रामरथ सीताराम राजभर (४५) या कामगाराचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.तालुक्यातील अंजूर रोड-माणकोली येथे चामुंडा कॉर्पोरेशन कम्पाउंडमध्ये वेल्डिंग रॉड बनविणारी प्रीमिअम कंपनी आहे. या कंपनीत वेल्डिंग रॉडसाठी लागणारी पावडर बनवित असताना अचानकपणे सायफ्लोन व डस्ट कलेक्टर मशीनमधील पाइपमधून धूर येऊन स्फोट झाला. या मशीनवर काम करणारा कामगार रामरथ सीताराम राजभर जागीच ठार झाला. तसेच मोहित शर्मा (२०) हा कामगार गंभीर जखमी आहे. तर राजेंद्र राजभर (२५), चंद्रशेखर विश्वकर्मा (३७), त्रिभुवन राजभर (३५), लालबहादूर यादव (२५), अशोक सिंग (२१), दिनेश केवट (२०) व संतोष (२२) हे कामगार जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्याच्या दृष्टीने मालकाने कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती. आग विझविण्याचे तीन छोटे बाटले संपल्यानंतर कंपनीत लागलेली आग मनपाच्या अग्निशामक दलाने विझविली. (प्रतिनिधी)