शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

“जय पवार तुमचाच भाऊ आहे ना, एक फोन करा, काकी मदत करतील”; भाजपा नेत्याची रोहित पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:31 IST

Sudhir Mungantiwar Slams Rohit Pawar: शंकास्पद काही करू नका, हवेत का बोलत आहात, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.

Sudhir Mungantiwar Slams Rohit Pawar: अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर एकीकडे संपूर्ण राज्य शोकाकूल असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी विविध दावे करण्यास सुरुवात केली. अद्यापही रोहित पवार विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेत असून, याबाबत प्रेझेंटेशन देत आहेत. रोहित पवार यांनी अलीकडेच दिल्ली गाठत अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटी घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा नेत्यांनी टीका केली आहे. 

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपला पती गमावला आहे. पती गमावण्याचे दुःख मोठे आहे. याबाबत त्याही काळजी घेतील ना. शिवाय त्यांचे दोन चिरंजीव आहेत. कायद्याने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून अधिकार दिलेले आहेत. त्यांनी आदेश दिले की, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. चौकशी व्हायला हवी, परंतु, शंकास्पद काही करू नका, अशी टीका भाजपा नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रोहित पवार यांच्यावर केली. 

जय पवार तुमचाच भाऊ आहे ना, एक फोन करा

भाजपाच्या दबावामुळे जय पवार यांनी पत्रकार परिषद घेतली नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जय पवार तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का, पैसे नाहीत का? हवेत का बोलत आहात. मी व्यवस्था करतो फोन करायची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून फ्री टेलिफोनची व्यवस्था करायला सांगतो. पत्रकार परिषद घेणार होतात, का नाही घेतली एकदा विचार तर ना? तुमच्या काकी आहेत, त्या पण मदत करतील ना, या शब्दांत मुनगंटीवार यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

दरम्यान, एफआयआरचा विषय आहे, बारामतीची घटना आहे, त्यामुळे तिथे एफआयआर करा, मुंबईत होत नाही. त्यामुळे झिरोमध्ये दाखल केला आणि बारामतीला पाठवला. अतिविशिष्ट कारण असेल तर एफआयआर घेतला जातो, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mungantiwar slams Rohit Pawar: Call your brother, your aunt will help.

Web Summary : Sudhir Mungantiwar criticized Rohit Pawar for seeking support for investigation into Ajit Pawar's accident. Mungantiwar advised Pawar to involve his family, including his brother and aunt, Sunetra Pawar, in addressing concerns.
टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारJay Pawarजय पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा