"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:48 PM2020-08-30T13:48:11+5:302020-08-30T13:57:41+5:30

आशिष शेलार यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना याबाबत पत्र लिहीले आहे.

bjp ashish shelar slams government over pothole in maharashtra | "चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"

"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"

Next

मुंबई -  भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी (30 ऑगस्ट) शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. "गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा "स्तुत्य उपक्रम" का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?" असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना याबाबत पत्र लिहीले आहे. "महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली. वेळीच ई-पास उपलब्ध करुन दिले नाहीत, एसटी उपलब्ध करून दिली नाही, रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीच केली नाही. क्वॉरंटाइन कालावधी व आरोग्याच्या उपाय योजना याबाबत सरपंच व कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्याशी वेळीच चर्चा केली नाही. अशा सरकारच्या आडमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहचला त्या चाकरमान्यांचे मुंबई- गोवा महामार्गावरी खड्यांनी जीव मेटाकुटीस आणला" असं पत्रात म्हटलं आहे.  

"मुंबई-गोवा महामार्ग पनवेलपासून चिपळूणपर्यंत पूर्णपणे उखडून गेलेला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेली नाही. सर्वत्र खड्डे, खडी अशा अवस्थेत हा महामार्ग असून रस्त्या शिल्लक राहिलेला नाही. ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांपेक्षा वाईट व दयनीय अवस्था या महामार्गाची झालेली आहे."

"दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात मात्र यावेळी कोणत्याही प्रकारे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांचा प्रवासात कंबरेचे आजार होतील की काय? अशी भीती वाटते आहे. कोकणच्या रस्त्याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल, कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल आम्ही निषेध करतो. असे सांगत किमान आता तरी रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी करतो" असं देखील आशिष यांनी पत्रात म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र 

माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या

CoronaVirus News : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला

सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान

Web Title: bjp ashish shelar slams government over pothole in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.