शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:40 IST

NCP Ajit Pawar Group News: पक्ष दिवसेंदिवस मजबूत बनत चालला असून जनकल्याणाचे काम वेग धरत आहे, ही बाब समाधानकारक आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

NCP Ajit Pawar Group News: शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर त्यांचे विचार कधी आपण विसरू शकत नाही. हा देश अनेक धर्म, पंथ, भाषांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एक संघ राहिलेला आहे, हे स्पष्ट करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार डी. एस. अहिरे, सिंदखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनिल नेरकर, काँग्रेस किसान सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, धुळे महानगरपालिकेचे माजी सभापती हरिश्चंद्र वाघ, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे  प्रदेश उपाध्यक्ष अबीद पठाण आदी प्रमुख नेत्यांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 

आमच्या पक्षात नवा-जुना वाद नाही

आमच्या पक्षात नवा-जुना वाद नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व आहे. ज्याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देताना समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. सन २०२९ मध्ये आपल्या महाराष्ट्रातून ९६ महिला या खास आरक्षित जागेतून आमदार होणार आहेत. तसेच देशात खासदारांच्या ५४३ जागा असून तिथेही वन थर्ड महिला खासदार होणार आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. ज्या देशाने पुरुषाबरोबर महिलांना वागणूक दिली आणि संधी दिली, मान-सन्मान दिला ते देश जगात पुढे आहेत, असेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, मी सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. सर्वांच्या सोबतीने पक्ष दिवसेंदिवस मजबूत बनत चालला असून जनकल्याणाचे काम वेग धरत आहे, ही बाब समाधानकारक असल्याची भावना यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाcongressकाँग्रेसDhuleधुळे