शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 9:27 PM

अजूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांची उमेद्वारीं मागे घेतलेली नाही.

मनोहर कुंभेजकर : गेल्या शुक्रवारी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सूतोवाच केले होते.मात्र अजूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांची उमेद्वारीं मागे घेतलेली नाही.

पश्चिम उपनगरात शिवसेनाभाजपात बंडखोरी झाल्याने त्यांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे त्यांना मनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धर्तीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

वर्सोवा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेना महिला विभागसंघटक व जेष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी बंड करून शक्ति प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज गेल्या शुक्रवारी सादर केला.वर्सोव्यातून भाजपाच्या दिव्या ढोले यांनी  लव्हेकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करून बंडखोरी केली आहे.

तर अंधेती पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या विरोधात भाजपाचे माजी बंडखोर नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली होती.जातीच्या अवैध दाखल्यामुळे मुरजी पटेल व त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांचे नगरसेवक पद रद्ध झाले आहे.

महायुतीच्या गठबंधनात शिवसंग्राम कडून लव्हेकर यांना परत येथून उमेदवारी जाहिर झाली आहे.राजुल पटेल यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते,तर मुरजी पटेल यांनी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.मुरजी पटेल यांनी जर त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर राजुल पटेल यांचा उमेदवारी अर्ज त्या मागे घेण्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेकडून सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने लोकमतशी बोलतांना दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना