Amol Kolhe : "दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:16 IST2026-01-28T14:14:43+5:302026-01-28T14:16:26+5:30

Amol Kolhe And Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Amol Kolhe reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Amol Kolhe : "दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना"

Amol Kolhe : "दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील; सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू, पोरकेपणाची भावना"

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये येत होते. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना, लँडिंगवेळी झालेल्या गोंधळामुळे अपघात होऊन विमान जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचे DGCAने सांगितले. 

अजित पवार यांच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील... अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. दादा तुमचे हे अकाली जाणे सर्वसामान्य जनतेलाही बिलकुल रुचले नाही. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे. ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेचला, तो आवाज आज शांत झाला, यावर विश्वासच बसत नाही" असं म्हटलं आहे. 

 "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट

अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "महाराष्ट्राच्या विकासपुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरतर अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आता आपल्यात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने आज एक उत्तम प्रशासक, शिस्तशील नेतृत्व आणि जनतेसाठी भल्या पहाटेपासूनच काम करणारा हक्काचा माणूस गमावला आहे."

"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक

"दादा तुमचे हे अकाली जाणे सर्वसामान्य जनतेलाही बिलकुल रुचले नाही. आज फक्त बारामतीकरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे. ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेचला, तो आवाज आज शांत झाला, यावर विश्वासच बसत नाही."

"मतभेद होते पण आदर कायम..."; अजित पवारांच्या निधनाने प्रियंका चतुर्वेदींना अश्रू अनावर

"दादांचा स्वभाव अनेकांना कडक वाटला असेल, पण त्या कडकपणामागे राज्याच्या हिताची कळकळ आणि कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा होता. राजकारणात शब्द बदलणारे खूप पाहिले, पण "दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच" हा जनतेचा विश्वास आता कायमचा स्मृती बनला आहे. मंत्रालयातील त्या रिकाम्या दालनस देखील अजित पवार यांच्यासारख्या कार्यशील व कर्तृत्व्वान नेतृत्वाची कायम उणीव भासेल. दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील..!" असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. 

Web Title : अजित पवार का असामयिक निधन: महाराष्ट्र में शोक और अनाथपन की भावना

Web Summary : बारामती के पास एक विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार के आकस्मिक निधन पर महाराष्ट्र में शोक है। अमोल कोल्हे ने गहरा दुख व्यक्त करते हुए पवार के समर्पण और उनकी अनुपस्थिति से हुई शून्यता को उजागर किया, जिसे आम लोगों ने गहराई से महसूस किया।

Web Title : Ajit Pawar's Untimely Demise: Grief and Orphaned Feeling Grips Maharashtra

Web Summary : Maharashtra mourns the sudden death of Deputy Chief Minister Ajit Pawar in a plane crash near Baramati. Amol Kolhe expressed deep sorrow, highlighting Pawar's dedication and the void left by his absence, felt deeply by the common people.