शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:20 IST

Ambadas Danve And BJP : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात मुंबईत विरोधी पक्षांनी 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट यांच्यासह मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्या. ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. विरोधक मतचोरीविरोधात आक्रमक होत असतानाच आता खतचोरी समोर आली आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे. "भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खात आहे. पावसाच्या अस्मानीने लुटल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपाचे लोक अशा 'सुलतानी' पद्धतीने लुटताहेत. मेवाभाऊंची खंबीर साथ... बोगस धंद्यात घालू हात..." असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहेत. तसेच काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.

"भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"

"वोटचोरी नंतर सादर आहे भाजपाचा 'खतचोरी'चा एपिसोड... मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पाहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत २५० रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजपा कार्यकर्ते सर्रास करत आहेत. सरकारी बॅगला बाजारात साधारण ११५० रुपये एवढा भाव आहे. इथे भाजपाच्या रूपाने कुंपणच शेत खात आहे!"

"मेवाभाऊंची खंबीर साथ, बोगस धंद्यात घालू हात..."

"पावसाच्या अस्मानीने लुटल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपचे लोक अशा 'सुलतानी' (की मुलतानी ) पद्धतीने लुटत आहेत. ही खतचोरी करणाऱ्या एका एका माणसाचे नाव मला माहिती आहे. हा खत'जिहाद' करणारा भाजपा कार्यकर्ता नक्की कोण जो धरलं जात असताना कृषी विभागाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांप्रती थोडी जरी आत्मीयता शिल्लक असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे नाव सांगावं! मेवाभाऊंची खंबीर साथ... बोगस धंद्यात घालू हात..." असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambadas Danve accuses BJP of fertilizer theft after vote rigging.

Web Summary : Ambadas Danve accuses BJP of fertilizer theft in Sillod, alleging party workers are filling government bags with duplicate fertilizer costing ₹250 and selling them for ₹1150. He alleges the BJP is exploiting farmers already hit by rains.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपाFarmerशेतकरीFertilizerखतेShiv Senaशिवसेनाtheftचोरी