शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा, सर्व जिल्ह्यांनी आगाऊ नोंदणी करावी - राजेंद्र शिंगणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 4:29 AM

अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात आॅक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

मुंबई : राज्यात आॅक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत आॅक्सिजनअभावी रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. आॅक्सिजनच्या वितरणात अडचणी येणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. सर्व जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आॅक्सिजनची आगाऊ नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी सोमवारी दिल्या.अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयात आॅक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. राज्यात दररोज एक हजार मेट्रिक टन आॅक्सिजनची निर्मिती होते. त्या तुलनेत सध्याची गरज ५०० मेट्रिक टन आहे. दिवसेंदिवस मागणी वाढत असली तरी कोरोना झालेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ अकरा टक्के रुग्णांनाच आॅक्सिजन द्यावे लागते. राज्यातील कक्षात १२ हजार तर अतिदक्षता विभागातील ७,८४० रुग्णांना आॅक्सिजन देण्याची गरज भासते.वाहतूक व्यवस्थेच्या अडचणींमुळे कुठेही आॅक्सिजनची कमतरता निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शिंगणे यांनी दिल्या. काही अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.सध्या काही ठिकाणी ठरावीक वेळेतच आॅक्सिजन पुनर्भरण केले जाते. ते आता २४ तास सुरू ठेवावे, उत्पादकांकडील मोठे टँकरसुद्धा संबंधित विभागांच्या परवानगीने वैद्यकीय आॅक्सिजन किंवा त्याच्या द्रव घटकांसाठी वापरावेत, आदी सूचना त्यांनी दिल्या.आॅक्सिजन पुरवठ्यासह मास्कच्या किमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसिवीर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला आॅक्सिजनचा साठा याचाही शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.कोरोनाविरुद्धचा लढाआता घरोघर पोहोचवा; मुख्यमंत्र्यांचे निर्देशकोरोनाविरुद्धचा लढा आपण घराघरात पोहोचवा, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल