Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!

Shane Watson on RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स आज एकमेकांशी भिडणार असून या महत्त्वाच्या सामन्याआधी शेन वॉटससनने आपल्या संघाची रणनिती स्पष्ट केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:05 IST

Open in App

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स आज एकमेकांशी भिडणार असून या महत्त्वाच्या सामन्याआधी केकेआरचा मार्गदर्शक शेन वॉटसन यांनी पत्रकार परिषदेत संघाची रणनीती आणि खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य केले. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे आव्हान आणि केकेआरचा महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन याच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला.

विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना वॉटसन म्हणाले की, "कोहलीला आपल्या कमकुवत बाजू कशा सुधारायच्या हे त्याला चांगले माहिती आहे. प्रत्येक संघ कोहलीला लक्ष्य करण्यासाठी योजना आखतो, पण तो त्यावर मात करण्यात माहीर आहे. गेल्या सामन्याप्रमाणेच तो सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करेल, अशी आम्हाला आशा आहे. परंतु, आमच्यासमोर कुठलाही फलंदाज असो, आम्हाला पहिल्या चेंडूपासून सतर्क राहून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा आहे."

दरम्यान, कॅमेरॉन ग्रीनबद्दल वॉटसन यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. वॉटसन म्हणाले की, "कॅमेरॉन ग्रीन फॉर्ममध्ये येत आहे. तो हळूहळू संघात आपल्या भूमिकेशी जुळवून घेत आहे. ग्रीनने अद्याप जास्त टी-२० क्रिकेट खेळलेले नाही, त्यामुळे त्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मी त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे."

स्पर्धेच्या सुरुवातीला संथ गतीने चाललेल्या केकेआरच्या मोहिमेला आता वेग मिळताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मोठ्या विजयाचा उल्लेख करत वॉटसन यांनी संघातील एकजुटीचे कौतुक केले. "आम्ही भुतकाळातील गोष्टी विसरून सध्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करत आहोत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी केली. आयपीएलचा इतिहास पाहता, असे अनेक संघ आहेत, ज्यांची सुरुवात डगमगत झाली. परंतु, शेवटी त्यांनीच जेतेपदावर नाव कोरले आहे. आम्हाला आमच्यावर विश्वास आहे", असेही तो म्हणाला.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Shane Watson's Mantra for KKR Before RCB Clash

Web Summary : Ahead of the RCB match, KKR's Shane Watson emphasized aggressive play from the first ball. He supports Cameron Green's development and praised the team's unity after their Delhi Capitals win, highlighting their focus on current performance and belief in their potential.
टॅग्स :आयपीएल २०२६शेन वॉटसनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सऑफ द फिल्ड