-अनिकेत घमंडी, डोंबिवली
मध्य रेल्वेच्या मोटरमनपाठोपाठ आता तिकीट तपासनीस (टीसी) कर्मचाऱ्यांवरही लक्ष्य पूर्ण करण्याचा ताण असल्याने त्यांच्याही प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. लांबपल्ल्याच्या डब्यात ७२ प्रवासी आसन क्षमता असताना ४०० प्रवासी प्रवास करतात. त्यातच ठिकठिकाणी टीसींवर हल्ले होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढले आहे.
मध्य रेल्वेमध्ये १,३०० टीसी कार्यरत असून त्यापैकी १,२०० दैनंदिन ड्युटीवर असतात. त्यापैकी सुमारे ४०० हे लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये स्क्वॉडमध्ये तर अन्य गाडीत, रेल्वे स्थानकात कार्यरत असतात.
अनेकांना लांबपल्ल्याच्या गाडीतून मुंबई ते भुसावळ आणि मुंबई ते पुणे, सोलापूरपर्यंत जावे लागते आणि परत यावे लागते. या प्रवासात त्यांनाही रेस्टरूम असतात; परंतु त्या खोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे ‘टीसी’नी सांगितले. जेवणाचा दर्जा चांगला नसल्याने खाण्यापिण्याची आबाळ होते. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र दुर्लक्ष केले आहे.
प्रवाशांचे होतात हाल
नियमानुसार लांबपल्ल्याच्या गाडीत विनाआरक्षित प्रवासी चढला तर त्याला समज देऊन गाडीतून उतरवणे हे टीसीचे कर्तव्य आहे. आता या प्रवाशांकडून दंड आकारला जातो. तो त्या डब्यांमधूनच प्रवास करतो, दंड आकारला की तो प्रवास करतो. त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे हाल होतात. त्यातून वाद होतात.
अनेकदा प्रकरण गुन्हा नोंदविण्यापर्यंत जाते
अनेकदा प्रकरण गुन्हा नोंदविण्यापर्यंत जाते. अशावेळी समोरची व्यक्ती क्रॉस तक्रार दाखल करते. परिणामी, टीसी दोन्हीकडून तणावाखाली येतात. ७ मे रोजी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. त्यावेळीही कामायनी एक्स्प्रेसमध्ये अमित कोळी नावाच्या टीसीवर हल्ला झाला होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या लक्ष्यपूर्तीमध्ये अशा हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अशी दंडाची आकारणी
लोकल डब्यात विनातिकीट प्रवासी आढळल्यास २६० रुपये दंड, मेल एक्स्प्रेसमध्ये ९०० ते १ हजार रुपये दंड, आणि एसी गाडीत आढळल्यास ३७५ रुपये दंड आकारला जातो.
रक्तदाब, मधुमेह विकार जडले : टीसींचा प्रवाशांशी थेट संबंध येत असल्याने एक प्रवासी हुज्जत घालायला लागला तर त्यामध्ये चार प्रवासी पडतात आणि तेही टीसींना लक्ष्य करून बोलतात. परिणामी, टीसींवर प्रचंड दडपण येत असून त्यांना रक्तदाब, मधुमेह विकार जडले आहेत.
रोज कमीतकमी ४० आणि जास्तीतजास्त शंभर केसचे लक्ष्य पूर्ण करणे हे शक्य होत नाही. त्या प्रकरणात टीसी हल्ल्याचे बळी पडतात. टीसींना पोलिस संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.
-संजीवकुमार दुबे, विभागीय सचिव, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ
Web Summary : Central Railway TCs face immense pressure due to overcrowding, assaults, and target-driven environments. Poor rest facilities and food quality exacerbate health issues like blood pressure and diabetes. TCs demand police protection amidst rising attacks and unrealistic expectations.
Web Summary : सेंट्रल रेलवे के टीसी भीड़, हमलों और लक्ष्य-संचालित वातावरण के कारण अत्यधिक दबाव में हैं। खराब विश्राम सुविधाएं और भोजन की गुणवत्ता रक्तचाप और मधुमेह जैसी स्वास्थ्य समस्याओं को बढ़ाती है। टीसी बढ़ते हमलों और अवास्तविक अपेक्षाओं के बीच पुलिस सुरक्षा की मांग करते हैं।