शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:13 IST

ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन

ठळक मुद्देदरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावरमराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले

सोलापूर :  यंदा ऊस गाळप हंगामावर कमालीचा परिणाम होईल असे दिसत असून सुरू झालेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली वगळता अन्य जिल्ह्यातील गाळप हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात आटोपला जाईल असे सांगण्यात आले.

मागील वर्षी राज्यात पाण्याची मोठी तीव्रता होती. जानेवारीपासून १० आॅगस्टपर्यंतचा कालावधी  हा कडक उन्हाचा होता. यामुळे  उसासह सर्वच पिके करपली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील   ऊस क्षेत्र उन्हाच्या तडाख्यातून वाचले होते; मात्र पुरामुळे  नुकसान झाले होते. सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा पट्टा वगळता अन्य ठिकाणचा ऊस जळाला होता. यामुळे यावर्षी अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नाही.

कोल्हापूर, पुणे व  सोलापूर विभागातील ९० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता व त्यापैकी तीन कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील तीन व औरंगाबाद विभागातील ७ कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम आटोपला आहे.  म्हणजे गाळप हंगाम सुरू केलेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरला सुरू झालेले कारखाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद होण्यास सुरुवात झाली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात बºयापैकी हंगाम आटोपला जाईल असे सांगण्यात आले. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ४१८ लाख मे. टन ऊस गाळप केला असून ४५६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातच ५० लाखांपेक्षा अधिक गाळप कमी होणार आहे. 

राज्यातील साखर हंगामावर एक नजर

  • -   कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावर असून, पुणे जिल्हा ५८.८८ लाख मे.टन गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहे.
  • -   दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर आहे. ऊस क्षेत्राची स्थिती पाहता सोलापूर जिल्हा गाळपात आणखीन मागे येईल असे सांगण्यात आले.
  • -  सातारा जिल्हा ४८ लाख ८१ हजार मे.टन, सांगली जिल्हा ४६.७१ लाख व अहमदनगर जिल्हा ४४.१५ लाख मे.टन  गाळप झाले आहे.
  • -   मराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले असून अन्य जिल्ह्याचे गाळप फारच कमी आहे. 

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने व गाळप होणारा सोलापूर जिल्ह्यातील एक साखर कारखाना बंद झाला आहे. ऊस तोडणी यंत्रणा अपुरी असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. यामुळेच ऊस कमी असला तरी कारखाने सुरू आहेत. जवळपास सर्वच कारखाने १० मार्चपर्यंत बंद होतील.  - रविकांत पाटील

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरahmadpur-acअहमदपूरPuneपुणे