शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२.५० लाख रेमडेसीव्हीर, १ कोटी १६ लाख मास्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:38 IST

कोरोना चाचण्या करण्यासाठी आजपर्यंत केंद्र सरकारकडून तपासणी किट दिले जात होते; मात्र आता ते राज्यांनी स्वत: विकत घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

सध्या सरकारी रुग्णातील डॉक्टरर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मठ्या प्रमाणात एन ९५ मास्क, ट्रिपल लियर मास्कची गरज असून त्यानुसार ३६ लाख एन-५ मास्क व ८० लाख ट्रिपल लेअर मास्क खरेदी केले जाणार आहेत.

कोरोना चाचण्या करण्यासाठी आजपर्यंत केंद्र सरकारकडून तपासणी किट दिले जात होते; मात्र आता ते राज्यांनी स्वत: विकत घ्यावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता करोना चाचणीसाठी लागणारे ३५ लाख आरटीपीसीआर किट राज्य सरकार विकत घेणार आहे. याचा अर्थ येत्या काळात ३५ लाख तपासण्या करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्याशिवाय ६० लाख रॅपिड अँटीजन टेस्ट किट देखील खरेदी करण्यात येणार आहेत. ४ लाख ८० हजार लिक्विड आॅक्सिजन, तर ४ लाख जम्बो आॅक्सिजन रिफिलिंग सिलेंडर खरेदी करण्यात येणार आहेत.

संपूर्ण खरेदी प्रक्रिया राबवताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राबवावी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वस्तूची खरेदी होणार नाही याची देखील काळजी विभागाने घ्यायची आहे, असेही या आदेशात म्हटले आहे. मात्र ही सगळी खरेदी हापकिन संस्थेमार्फत केली जाणार की नाही याविषयी या आदेशात कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. सरकारने सर्व विभागांना लागणारी औषध खरेदी हापकिन संस्थेच्या मार्फतच होईल, असे शपथपत्र उच्च न्यायालयात दाखल केले आहे. असे असताना साडेसहाशे कोटींची खरेदी ही कोणामार्फत होणार याविषयी या आदेशात स्पष्टता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी औषधे वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला ६३३ कोटी ९२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या पैशातून अडीच लाख रेमडेसीव्हीर इंजेक्शन, फेविपीरावीरच्या तीन लाख गोळ्यांच्या स्ट्रीप तसेच अन्य साहित्यांची खरेदी करण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंतची गरज लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आली आहे.

रेमडेसीव्हीरचा तुटवडा
राज्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल असून चढया दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत र्औषध विक्रेत्यांकडे विचारणा केली असता औषध निर्माण कंपनीकडूनच पुरेसा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,हा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला असून या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

आकडे बोलतात...
औषध दर संख्या
रेमडेसीव्हीर २१८२.८८ २४४२००
फेविपीरावीर ८४७.४६ २७०००
आरटी-पीसीआर कीट ७८.४० ३५०००००
रॅपिड अँटिजन कीट ४९३ ६०००००
आॅक्सिजन रिफिलिंग २५० ४८००००
लिक्विड आॅक्सिजन २५००० ४०००
एन ९५ मास्क ४७.७७ ३६०००००
ट्रिपल ले. मास्क ६.५० ८०००००
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र