शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 21:37 IST

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने (BJP) आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे. आमदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पक्षनेतृत्व या अहवालाचा अभ्यास करणार आहे. २५ मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर किंवा ३० मे नंतर कधीही भाजपाच्या नेत्यांची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीसाठी मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी डॉ. महेंद्र सिंह, सहप्रभारी सतीश उपाध्याय हेसुद्धा मध्य प्रदेशमध्ये येणार आहेत. 

प्रभारी, सहप्रभारी यांच्यासह मध्य प्रदेश भाजपाचे दिग्गज नेते या अहवालाचं अध्ययन करतील. मात्र ३० मे पर्यंत मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांमध्ये असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भाजपाच्या अर्ध्या आमदारांनी अहवाल सादर केला आहे. जे निवडणूक प्रचारासाठी गेलेले आहेत, त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे. आमदारांकडून मिळणारा अहवाल आणि पक्षाने तयार केलेला अहवाल यांची पडताळणी केली जाईल. तसेच त्या आधारावर आमदारांचं आकलन होईल, तसेच त्यामधून त्यांचं राजकीय भविष्य निर्धारित केलं जाईल. 

भाजपाने आमदारांकडून माहिती मागवलेले आठ प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत१) आमदारांच्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशी होती?२)मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीची स्थिती कशी होती.३) कुठल्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ३७० मतं अधिक पडली. ४)जिथे कमी मतदान झालंय, त्याचा पक्षाच्या सकारात्मक निकालावर किती परिणाम होईल?५)मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं मूळ कारण काय आहे? ६) आमदारांनी मतदान वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले?७) पक्षाच्या कुठल्या नेत्याने खूप मेहनत घेतली आणि कुणी केवळ औपचारिकता पूर्ण केली.८) प्रचारादरम्यान आमदार ग्रामीण भागात किती रात्री वास्तव्याला राहिले?

दरम्यान, भाजपाने आमदारांकडे मागवलेल्या या अहवालावर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपाला फिडबॅक घेण्याची काय गरज आहे. निवडणूक आयोगापासू सगळी व्यवस्था त्यांचीच आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या संगीता शर्मा म्हणाल्या की, अजून काही उरलं तर ईव्हीएम सेट केली जाते. मात्र एवढं सारं करूनही भाजपा फिडबॅक घेत असेल तर त्यांना वास्तव समजलं आहे, आपला पराभव होणार हे त्यांना कळून चुकलंय. त्यांनी जे लक्ष्य समोर ठेवलं होतं, त्यापेक्षा ते खूप मागे राहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस