- राजकुमार जाेंधळे लातूर - पिवळ्या रंगाचा धातू असलेल्या नकली सोन्याचे बिस्कीट खरे असल्याचे भासवूत प्रति तोळा ५० हजार रुपयांत औसा येथील युवकाला विक्री करणाऱ्या टाेळीतील तिघांना अटक करण्यात आली. बनावट साेने विक्रीचा डाव पाेलिसांनी उधळला. पकडण्यात आलेले आराेपी हे जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील आहेत. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, शुक्रवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास औशातील युवक अमर बसवराज रड्डे हे जुन्या बसस्थानकासमाेर उभे हाेते. यावेळी अनोळखी तिघेजण जवळ आले. आम्हाला आर्थिक अडचण असून, आमच्याकडे पाच तोळ्याचे दोन बिस्कीट आणि एक तोळ्याची अंगठी आहे. ते तुम्हाला प्रति तोळा ५० हजार रुपयाला देतो, असे म्हणू लागले. काही वेळ हे संभाषण फिर्यादीसोबत सुरु होते. दरम्यान, त्यांनी पावती देण्याला नकार देताच फिर्यादीच्या मनात संशय आला. त्यांने तिघांना बाेलण्यात गुंतवले. ठिक आहे, मी पैशाची तडजोड करतो म्हणून बाजूला जात पोलिसांना फोन केला. फोन करताच फौजदार भाऊसाहेब माळवदकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना रंगेहाथ पकडून झडती घेतली असता, तिघांपैकी एकाजवळ गुलाबी कागदात गुंडाळलेले दोन पिवळ्या रंगाचे धातूचे बिस्कीट, एक अंगठी आढळून आली. त्यांनी सदरचे सोने नकली असल्याची कबुली दिली. केरबा सूर्यभान जाधव (वय ७०, रा. सलगरा बु. जि. लातूर), केशव छगन जाधव (वय ५०, रा. दहिटणे जि. जालना ह.मु. शिवनी बु. ता. औसा) आणि गोवर्धन गणपत गोरे (वय ४०, रा. नूर कॉलनी जि. बीड) यांना अटक केली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Three individuals from Jalna, Beed, and Latur were arrested in Ausa for attempting to sell fake gold biscuits, claiming they were genuine, to a young man for ₹50,000 per tola. Police foiled the fraudulent scheme, and a case has been registered.
Web Summary : लातूर के औसा में नकली सोने के बिस्कुट बेचने की कोशिश करते हुए जालना, बीड और लातूर के तीन लोगों को गिरफ्तार किया गया। उन्होंने एक युवक को 50,000 रुपये प्रति तोला में असली बताकर बेचने का प्रयास किया। पुलिस ने धोखाधड़ी विफल कर दी, मामला दर्ज।