शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:49 IST

बहुतांश ठिकाणी महायुतीतच लढती, काँग्रेसचीही मोर्चेबांधणी

कोल्हापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांशी तालुक्यात महायुतीअंतर्गत तिन्ही पक्ष एकमेकांसमोर राजकीय कुस्ती करण्यासाठी शड्डू ठोकून उभे राहिले असून आपापले बालेकिल्ले राखण्यासाठी आजी, माजी आमदारांसह नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फारच कमी ठिकाणी दुरंगी लढती असून अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. महाविकास आघाडीकडे आपल्याकडील उमेदवार जाऊ नयेत यासाठी स्वतंत्र लढणाऱ्या महायुतीचा हा डाव यशस्वी होणार की कसे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

‘करवीर’मध्ये ७ ठिकाणी तिरंगी

करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी वडणगे, उचगाव, पाडळी खुर्द, शिये, पाचगाव, सडोली खालसा, शिंगणापूर या सात मतदारसंघांत तिरंगी लढत होत आहे. कळंबे तर्फ ठाणे, मुडशिंगी, निगवे खालसा, गोकुळ शिरगावमध्ये दुरंगी सामना होत असून, ‘सांगरूळ’मध्ये मात्र चौरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेच्या १२ जागांसाठी ४५ ते पंचायत समितीच्या २४ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विविध मतदारसंघांत काँग्रेसबरोबरच , राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप, शिंदेसेनेचेही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येते. संपूर्ण तालुकाभर एकच राजकीय चित्र दिसून येत नाही.

हातकणंगलेमध्ये ११ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषदेच्या ११ जागा असलेल्या हातकणंगले तालुक्यात ४१ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीसाठी ९० उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २२ जागांसाठी ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे तालुक्यातील चित्र असले तरी कुंभोज गटात ‘जनसुराज्य’नेही आपला उमेदवार दिला आहे.

कागलमध्ये स्वाभिमानी, माकप शिंदेसेनेसोबत

कागल तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपच्या युतीविरोधात शिंदेसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माकप एकत्रित येऊन लढा देणार आहेत. या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदेसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत.

गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ यांच्यासमोर भाजपचे आव्हान

गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी अर्ज दाखल केलेल्या ५४ पैकी ३४ उमेदवारांनी माघार घेतली असून २० उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १० जागांसाठी अर्ज दाखल केलेल्या १०७ पैकी ६७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी नूलमध्ये चौरंगी, नेसरीत चौरंगी, गिजवणेत तिरंगी, भडगावमध्ये दुरंगी तर हलकर्णीत पंचरंगी सामना होत आहे.

शिरोळमध्ये माघारीवरून धक्काबुक्की

शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी २४ तर पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीविरुद्ध राजर्षी शाहू विकास आघाडी अशी लढत होत असली तरी भाजप चार जि. प. व सात पं.स. जागा लढवित आहे. अर्ज माघारीवरून निवडणूक कार्यालयाजवळच धक्काबुक्कीचा प्रकार मंगळवारी घडला.

भुदरगडमध्ये जिल्हा परिषदेसाठी ४३ जणांची माघार

भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी १०, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तालुक्यातील गारगोटी,पिंपळगाव, आकुर्डे, कडगाव या चार जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ५३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ४३ जणांनी माघार घेतल्याने केवळ १० उमेदवार मैदानात राहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर माघार करवून घेण्यात नेत्यांना यश आले आहे तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी १३६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११३ जणांनी माघार घेतली असून २३ उमेदवार अंतिम लढतीत आहेत.

राधानगरी तालुक्यात बहुरंगी लढती

राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २३ तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सरवडे मतदारसंघात तिरंगी, राधानगरी व राशिवडे मतदारसंघात चौरंगी, कसबा वाळवेमध्ये पंचरंगी तर कसबा तारळेमध्ये बहुरंगी लढत होत आहे. तालुक्यात निवडणुकीच्या अगोदरपासून भाजप व शिंदेसेनेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू होती मात्र ती फिस्कटली.

चंदगडमध्ये महायुतीतच धूमशान

चंदगड तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी सरळ दुरंगी लढत होत असून, अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अडकूर गटात मात्र काँग्रेसने तिन्ही अर्ज ठेवत महायुतीला आव्हान देत निवडणुकीत रंगत आणली आहे. उद्धवसेना केवळ अडकूर गणातून निवडणूक मैदानात असून, शिंदेसेनेने ऐनवेळी उमेदवार दिलेला नाही.

गगनबावड्यात काँग्रेस विरोधात शिंदेसेना-भाजप युतीमध्ये सामना

गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी पाच तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेस विरोधात शिंदेसेना व भाजप महायुतीमध्ये सरळ सामना होत आहे.

शाहूवाडीत राष्ट्रवादी (अजित पवार) उद्धवसेनेसोबत, भाजपही विरोधात

शाहूवाडी तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी १३ उमेदवार तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात राहिले.
तालुक्यात जनसुराज्यविरोधात उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र आले आहेत तर भाजपनेही विरोधात उमेदवार उभे केले आहेत.

आजऱ्यात महायुतीतच संघर्ष

आजरा तालुक्यातील दोन गटांत महायुतीमध्येच संघर्ष असल्याचे चित्र आहे. उत्तूर गटामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), ताराराणी आघाडी आणि शिंदेसेना असा तिरंगी सामना आहे तर पेरणोली गटामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना आणि भाजप असा प्रामुख्याने तिरंगी सामना आहे.

पन्हाळ्यात जनसुराज्यविरोधात वेगवेगळे पक्ष

पन्हाळा तालुक्यातही एकच चित्र दिसत नसून जनसुराज्यविरोधात काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना लढत आहे तर कोडोलीमध्ये दोन्ही उमेदवार अपक्ष असून त्यांना विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election 2026: Multi-cornered Fights Test Leaders' Fortunes

Web Summary : Kolhapur ZP elections see multi-cornered fights. Mahayuti parties clash, testing leaders to retain their strongholds. Various alliances and strategies emerge across different talukas, making the political landscape complex and unpredictable. Results will reveal the success of independent factions against the Mahavikas Aghadi.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस