शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दारूची तस्करी, एक्साइजच्या पथकाने फिल्मी स्टाइलने पाठलाग केला; कारचा टायर फुटल्याने टोळी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:53 IST

पोलिस होण्याची संधी हुकली; तस्कर बनला

कोल्हापूर : सोलापूरची भाजी गोव्यात नेऊन विकल्यानंतर येताना ११ लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन येणाऱ्या तस्करांच्या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याकोल्हापूर विभागीय भरारी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी (दि. ७) मध्यरात्री राधानगरी मार्गावर वाशी आणि हळदी गावच्या हद्दीत सापळा रचून केली. कारवाईची चाहूल लागताच पळून जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने सराईत तस्कर पथकाच्या हाती लागले. पथकाने चौघांना अटक करून त्यांची १५ लाखांची दोन वाहने जप्त केली.

ऋषिकेश बिभीषण गायकवाड (वय २६, रा. वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), स्वप्निल उर्फ मुन्ना भीमराव वसेकर (२६), संकेत संतोष सोनटक्के (२१, दोघे रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि सूरज संजय लोंढे (२४, रा. देगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर दारू तस्करीचा गुन्हा दाखल केला असून, तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी झाली.

भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारी दोन वाहने कोल्हापूरच्या दिशेने येणार असल्याची टिप अधिकाऱ्यांना मिळाली होता. त्यानुसार पथकाने वाशी आणि हळदी येथे सापळा रचला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी गावच्या हद्दीत संशयित पिकअप वाहन अडवून झडती घेताना त्यात भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे रिकामे कॅरेट आढळले. त्यामागे लपवलेले दारूचे १५२ बॉक्स पथकाच्या हाती लागले.

वाहनचालक ऋषिकेश गायकवाड याला अटक करून पथकाने दारू आणि वाहन असा १७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. भाजी विक्रीच्या आडून दारूची तस्करी करीत असल्याची कबुली गायकवाड याने दिली. निरीक्षक के. एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एम. फटांगरे यांच्यासह सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, योगेश शेलार, आदींच्या पथकाने कारवाई केली.

फिल्मी स्टाइलने पाठलाग करून पकडले

हळदी येथील पथकाने संशयित कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारवाईची चाहूल लागताच कार वळवून तस्कर राधानगरीच्या दिशेने निघाले. पथकाने त्यांचा पाच ते सहा किलोमीटर पाठलाग केला. कारचा टायर फुटल्याने सराईत तस्कर स्वप्निल उर्फ मुन्ना वसेकर आणि त्याचे दोन साथीदार पथकाच्या हाती लागले. त्याच्या कारमध्ये दारूचे ३५ बॉक्स मिळाले. कार आणि दारू असा ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

सोलापुरात विक्री

अटकेतील चौघे २० ते २६ वयोगटातील आहेत. यातील मुन्ना हा टोळीचा म्होरक्या असून, तो सराईत तस्कर आहे. गोवा बनावटीची दारू सोलापूर जिल्ह्यातील छुपे विक्रेते, काही वाईन शॉप आणि महामार्गांशेजारी असलेल्या हॉटेल्सना विकली जाते. यातून तस्करांनी लाखोंची कमाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिस होण्याची संधी हुकली; तस्कर बनला

अटकेतील ऋषिकेश गायकवाड हा पोलिस भरतीची तयारी करीत होता. तीन वेळा अगदी थोडक्या गुणांनी त्याची पोलिस होण्याची संधी हुकली. त्यानंतर कमी वेळेत जादा पैसे मिळवण्याच्या उद्देशाने तो दारू तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचे अधिका-यांन सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर