शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

स्टडी रूमलाही ‘वेटिंग’

By admin | Updated: January 9, 2015 00:06 IST

स्पर्धा परीक्षांचा परिणाम : शहरातील वाचनालये बनली अभ्यासाची केंद्रे

संदीप खवळे - कोल्हापूर -स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील ग्रंथालयांच्या अभ्यासिका हाऊसफुल्ल झाल्या आहेत. शेकडो विद्यार्थी ग्रंथालयांत जागा मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत़ महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव ग्रंथालयाच्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यासिकेत प्रवेश मिळण्यासाठी सुमारे सहाशे अर्ज आले आहेत. वाढत्या प्रतिसादामुळे शहरातील खासगी क्लासेसमध्ये तर वेटिंग लिस्टच तयार करण्यात आली आहे़
राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांतील दुर्गम गावांपासून शहर व उपनगरांतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत़ अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी मुलींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे़ सकाळी सातपासून रात्री आठपर्यंत ग्रंथालयांत विद्यार्थी अभ्यास व वाचन करतात. काही खासगी क्लासेसनी नाईट लायब्ररीचीही सोय केली आहे़ भास्करराव जाधव गं्रथालय येथे सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ केवळ सातशे रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी विविध पुस्तके आणि अभ्यासिकेची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे़
वाढती स्पर्धा, प्रथितयश अधिकाऱ्यांची प्रेरणादायी व्याख्याने यांचा परिपाक म्हणून गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढत आहे़ राज्य सेवा, पीएसआय, एसटीआय तसेच बँकिंग या क्षेत्रांतील परीक्षांना विद्यार्थ्यांची पसंती आहे़ विशेष म्हणजे वाचनालयातील मुलींची संख्या लक्षणीय आहे़
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शहरात काम करणाऱ्या खासगी क्लासेसनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररींची सुविधा केली आहे़ अगदी कॉर्पोरेट आॅफिसच्या धर्तीवर या वाचनालयांची रचना करण्यात आली आहे़ जेवण आणि चहापानासाठी लागणारा वेळ यांचा अपवाद वगळता तासन्तास विद्यार्थी शहरातील वाचनालयात अभ्यास करताना दिसतात़
फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप, चित्रपट, सण यांना कोसो दूर ठेवून अधिकारी व्हायचेच या ध्यासाने पछाडलेली मुले-मुली शहरातील ग्रंथालयात कैक तास झिजत आहेत़ त्यामुळे अधिकारी होण्याच्या का निमित्ताने असेना, शहरातील अभ्यासिकांत गर्दी होत आहे़

राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत सातशे रुपयांत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली आहे़ या अभ्यासिकेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे़ अभ्यासिकेत प्रवेश मिळविण्यासाठी आतापर्यंत सहाशे उमेदवारांनी नोंद केली आहे़ यामध्ये मुलींची संख्या सुमारे साठ टक्के आहे़
- समीर म्हाब्री, गं्रथपाल,
भास्करराव जाधव वाचनालय, कोल्हापूर


गर्दीची कारणे काय..?
स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची किंमत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ही पुस्तके घेणे परवडत नाही़ सगळ्यांना खासगी क्लासेसची फी परवडत नाही़ ही बाब ओळखून महापालिकेच्या पुढाकाराने भास्करराव जाधव वाचनालयात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासिका करण्यात आली आहे़ अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या अभ्यासिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ सकाळी आठपासून सायंकाळी सातपर्यंत मुले-मुली इथे अभ्यास करीत असतात़ विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहून लाखो रुपयांची पुस्तके महापालिकेने या वाचनालयास उपलब्ध करून दिली असल्याची माहिती गं्रथपाल समीर म्हाब्री यांनी दिली़