शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

बैलाचा जीव वाचविण्याची धडपड अखेर सार्थकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:49 IST

wildlife kolhapur- गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व गगनबावडा ग्रामस्थांना आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले.

ठळक मुद्देबैलाचा जीव वाचविण्याची धडपड अखेर सार्थकीलाइटच्या प्रकाशात तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश

मेघा जाधवसाळवन : गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व गगनबावडा ग्रामस्थांना आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले.याबाबत अधिक माहिती अशी, गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या विहीरीत येथीलच सचिन गावडे यांचा बैल गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला. उन्हाळ्यामुळे या विहिरीत पाणी कमी होते. ही घटना काही ग्रामस्थांनी पाहीली आणि या बैलाला बाहेर काढण्यासाठी लोकांची पळापळ सुरू झाली. मात्र विहीर अत्यंत अरूंद असल्याने बैलाला बाहेर काढण्यात मर्यादा येवू लागल्या.

याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीम गगनबावडा येथे दाखल झाली. विहिरीतील पाणी बाहेर काढल्यानंतर रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने या बैलाला विहीरीतून मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले. लाइटच्या प्रकाशात तब्बल आठ तास बैलाचा जीव वाचविण्यासाठी चाललेली धडपड अखेर सार्थकी लागली.यावेळी रेस्क्यू टीमसह गुरुनाथ कांबळे, उपसरपंच मुस्ताक वडगावे व येथील युवकांनी परिश्रम घेतले. हा बैल किरकोळ जखमी झाला आहे. एका मुक्या जिवाला वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम व गगनबावडा येथील युवकांनी केलेली धडपड त्या बैलाला जीवदान देणारी ठरली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर