शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तगड्या पॅनेलमुळे ‘गोकुळ’मध्ये काट्याची टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : तगड्या पॅनेलमुळे ‘गोकुळ’च्या रणांगणात काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे. गडहिंग्लज विभाग व शाहूवाडी तालुक्यातील सत्तारूढ गटाची बांधणी ...

कोल्हापूर : तगड्या पॅनेलमुळे ‘गोकुळ’च्या रणांगणात काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे. गडहिंग्लज विभाग व शाहूवाडी तालुक्यातील सत्तारूढ गटाची बांधणी काहीशी भक्कम, तर राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, कागलमध्ये विरोधी आघाडीने चांगली मोट बांधल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. सर्वाधिक मते असणाऱ्या करवीरमध्ये सत्तारूढ गटाने तुलनेत पॅनेल बांधणीत बॅलेन्स राखला आहे. मात्र, त्याचा फायदा कसा उठविला जातो, यावरच मताधिक्याचा लंबक झुकणार आहे.

दोन्ही आघाड्यांनी पॅनेल बांधणी करताना एक गठ्ठा मताचे गणित पाहिले आहे. चंदगड, आजरामध्ये सत्तारूढ गटाकडे ठरावांची संख्या अधिक आहे. विरोधी आघाडीने घुसण्याचा प्रयत्न केला असला तरी ती किती मते फोडणार यावर दोन्ही तालुक्यांतील बेरीज-वजाबाकी राहणार आहे. गडहिंग्लजमध्ये जातीचे समीकरण सांभाळत दोन्हीकडून दोन-दोन उमेदवार दिले आहेत. दोन्ही आघाड्या सध्यातरी जवळपास आहेत, मात्र उट्टे काढण्याचे राजकारण उफाळून आले तर ते चारही उमेदवारांच्या दृष्टीने घातक ठरू शकते. राधानगरीत विरोधी आघाडी भक्कम दिसते. उमेदवारी न मिळाल्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न विरोधी आघाडीचा सुरू असतानाच सत्तारूढ गटाचाही वेगळ्या मार्गाने त्यांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. भुदरगडमध्ये दोन्ही आघाडीची ताकद सारखी असली तरी उमेदवारी डावलल्याबरोबरच घराणेशाहीचा राग उफाळला तर दिग्गजांना झटका बसू शकतो. कागलमध्ये ठरावांची ताकद कमीअधिक असली तरी थेट नेत्यांचे वारसदार रिंगणात असल्याने संघर्षापेक्षा सोयीचे राजकारण पाहिले जाईल, हे निश्चित आहे. पन्हाळा तालुक्यात ठरावधारकांवर नरके कुटुंबाचेच वर्चस्व आहे. मात्र, अजित व चेतन एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ठरावधारकांची गोची झाली आहे. कोण कोणाबरोबर राहणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तरीही येथे दोन्ही नरके, अमरसिंह पाटील या पै-पाहुण्यांना धरूनच येथे ठरावधारक पुढे सरकेल, असा अंदाज आहे. गगनबावड्यात विरोधी आघाडीचा वरचष्मा आहे. त्यात येथे उमेदवार दिल्याचा फायदाही त्यांना होऊ शकतो. शाहूवाडीत तुलनेत सत्तारूढ गटाकडे ठरावांची संख्या अधिक आहे. येथे छुप्या मदतीतही ते पुढेच राहतील, असे सध्याचे तरी चित्र आहे.

सर्वाधिक मते असलेल्या करवीरमध्ये सत्तारूढ गटाने पॅनेल बांधणीत बॅलेन्स राखला आहे. सांगरूळ, सडोली खालसा, परिते परिसरात ३४० मतदान आहे. येथे सत्तारूढ गटाने तीन, तर विरोधी आघाडीने एकच उमेदवार दिला आहे. याउलट शिये, वडणगे परिसरात ७८ मतांच्या ठिकाणी विरोधी आघाडीने दोन उमेदवार दिले. काेल्हापूर दक्षिणमध्ये १३५ मताला विरोधी आघाडीने दोन जागा दिल्या आहेत. उमेदवाराचा चुकलेला बॅलेन्स सांभाळण्यासाठी विरोधी आघाडीच्या नेत्यांची कसरत होणार हे नक्की आहे.

भांडवली गुंतवणुकीच्या व्याजाकडे लक्ष

विरोधी आघाडीने ठरावधारकांकडे भांडवली गुंतवणूक केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या गुंवतणुकीवर ठरावधारक संपूर्ण व्याज देणार की त्यात थोडी कपात करणार, यावरच त्या गुंतवणुकीला महत्त्व राहणार आहे.

शिरोळमध्ये छुपी मदत निर्णायक

शिरोळ तालुक्यात १३४ ठराव असूनही येथे उमेदवार नाही. त्यामुळे या तालुक्याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन्ही आघाड्यांकडे नेतेमंडळी आहेत, मात्र त्यांच्या पुढच्या राजकारणासाठी आक्रमक राहणार नाहीत. त्यातूनच छुपी मदत निर्णायक ठरणार आहे. हातकणंगलेमध्ये यावेळेला उमेदवारी असली तरी सत्तारूढ गटाचे पारडे काहीसे जड दिसते.