शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराचा फज्जा

By admin | Updated: August 30, 2015 23:11 IST

शाळेत मुले उपाशीच : आहार पुरवठा स्थगित करण्याचा मार्केटिंग फेडरेशनला आदेश

प्रकाश पाटील - कोपार्डे  कोणतेही मूल कुपोषित राहू नये, अधिकाधिक मुले शाळेत येण्यासाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. योजनेचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करून तिची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कडक कायदेही करण्यात आले आहेत. मात्र, गेले वर्षभर पोषण आहारासाठी धान्याचा अनियमित पुरवठा होत असल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. गेले २० ते २५ दिवस करवीरमधील शालेय मुले पोषण आहारापासून वंचित आहेत.ग्रामीण भागात शालेय मुलांच्या आहाराची हेळसांड होते हे लक्षात आल्यानंतर शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. यासाठी मुख्याध्यापकांवर मुलांना योग्य व प्रमाणित आहार देण्याची जबाबदारी सोपविली व ते शिजवून देण्याचे काम बचत गटांकडे सोपविले आहे. शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य यामध्ये तांदूळ, तेल, तिखट व डाळ पुरविण्याचे काम मार्केटिंग फेडरेशनकडे आहे.या योजनेचा समावेश अन्नसुरक्षा योजनेत करण्यात आला आहे. तांदूळ, धान्य, आदी माल संपल्याचे कारण देऊन शालेय पोषण आहार योजनेअंर्तगत धान्य शिजवून न देता लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला शाळेच्या मुख्याध्यापकांबरोबर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या योजनेत कसूर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा व अन्न सुरक्षा कायद्याचा भंग केल्यामुळे संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेशही काढण्यात आला आहे. यासाठी २० दिवस पुरेल इतका धान्यसाठा असतानाही धान्याची मागणी करून एक दिवसही त्यामध्ये खंड पडू न देता नियमित शालेय पोषण आहार शिजवून देण्याच्या सक्त सूचना आहेत. मात्र, शासकीय पातळीवरच शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी लागणाऱ्या धान्यादी पदार्थांचा अनियमित पुरवठा सुरू असल्याने या शालेय पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला असता ज्या मार्केटिंग फेडरेशनकडे धान्य पुरवठा करण्याचा ठेका आहे, त्यांचा धान्य पुरवण्याचा करार संपला असून आता याबाबत दरवाढ करून द्यावी, अशी मागणी होत असल्याचे समजते. कारवाई होणार काय?शालेय पोषण आहार देण्यात मुख्याध्यापकांनी कसूर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. काही ठिकाणी शिक्षकांना अशा कारवाईला सामोरेही जावे लागले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारासाठी शासनाच्या अनियमित धान्य पुरवठ्याला जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया पालक, शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.