शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृह : सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवले, नंतर कारागृहात पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:57 IST

Crimenews Jail Police Kolhapur- कळंबा कारागृहाबाहेर बाकड्यावर सीमकार्ड ठेवले अन‌् नंतर कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड गुपचूप घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

ठळक मुद्दे कळंबा कारागृह : सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवले, नंतर कारागृहात पोहोचले!आणखी दोन संशयितांना अटक; कारागृहातील यंत्रणा सहभागाची शक्यता

कोल्हापूर : कळंबा कारागृहाबाहेर बाकड्यावर सीमकार्ड ठेवले अन‌् नंतर कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड गुपचूप घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.दरम्यान, कारागृहाच्या भिंतीवरून दहा मोबाईल व गांजा आत फेकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी अटक केली. ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (वय २२, रा. साईनगर, शहापूर, इचलकरंजी), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.दि. २२ डिसेंबरला मध्यरात्री भीष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र धुमाळ, ऋषिकेश सदाशिव पाटील (२५, रा. कोदवडे, ता. राधानगरी, सध्या रा. गंगावेश), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश) यांनी कळंबा कारागृहाच्या भिंतीवरुन आत मोबाईल फेकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पैलवान ऋषिकेश व शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी) याला यापूर्वीच अटक केली आहे.दरम्यान, गुरुवारी राजेंद्र धुमाळ व ओंकार गेंजगे यांना अटक केली. गेंजगे हा विटा (सांगली) येथील एका खूनप्रकरणी कारागृहात न्यायालयीन कैदी होता. काही महिन्यांपूर्वी गेंजगे याच्या सहकाऱ्याने सीमकार्ड कारागृहाबाहेर बाकावर ठेवले. आत जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड कारागृहात गेंजगेपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

हेच सीमकार्ड शुभम ऐवळे याच्या नावे असल्याचे तसेच ते कारागृहात गेंजगे व खंडेलवाल यांनी वापरले. त्यामुळे याप्रकरणी कारागृहातील काही कर्मचारी सहभागी असल्याचेही दिसते. अटकेतील गेंजगे व शुभम ऐवळे हे दोघे नातेवाईक आहेत. भिंतीवरून कारागृहात राजेंद्र धुमाळ यानेच आत मोबाईलचे गाठोडे टाकल्याचे चौकशीत उघडकीस आले.कारागृहातून खंडेलवालनेच फोनवरुन १० मोबाईल मागवलेसापडलेल्या सीमकार्डचा गेंजगे व खंडेलवाल यांनी किमान तीन महिने कारागृहातून बाहेर कॉलसाठी वापर केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल याने कारागृहातून याच सीमकार्डवरुन भीष्म्या चव्हाण याला फोन करून दहा मोबाईल पाठविण्याचा निरोप दिल्याचेही दिसून आले.भीष्म्या चव्हाण अटकेनंतर उलगडाअद्याप पोलिसांना गुंगारा देणारा भीष्म्या चव्हाण याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर