शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी ‘कागल-राधानगरी लिमिटेड पक्ष’

By admin | Updated: August 29, 2015 00:08 IST

अरुण इंगवले यांचा घरचा आहेर : नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

कोल्हापूर : पक्षाची पदे घ्यायची आणि घरी बसण्याची प्रवृत्ती पक्षात वाढली असून, नेत्यांचे जिल्ह्याच्या पूर्व भागात लक्ष नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस हा ‘राधानगरी-कागल-चंदगड लिमिटेड’च पक्ष असल्याची खरमरीत टीका पक्षाचे खजानीस अरुण इंगवले यांनी केली. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप शुक्रवारी पक्षाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाले, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निरीक्षक दिलीप पाटील होते. पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवीत इंगवले म्हणाले, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याने पक्ष कमकुवत होत आहे. राधानगरी, चंदगड, कागल, भुदरगड म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. नेत्यांनी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांकडे लक्ष द्या. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, दिल्लीतील सरकारला कळेना आणि राज्य सरकारला समजेना, अशी अवस्था झाल्याने येत्या वर्षभरात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून सरकारचे वाभाडे काढावे. पूर्र्वेकडे लक्ष नाही, असे म्हणू नका. जिल्हा बॅँकेचे दोन संचालक पूर्वेकडचे आहेत. काही ठिकाणी नाराजी आहे, ती दूर केली जाईल. पक्षात राहून चुकीची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. आजपर्यंत ताठ मानेने राजकारण केले, कारवाईही त्याच ताकदीने करू. दिलीप पाटील म्हणाले, सहकार चळवळ ही आपली शक्तिस्थळे आहेत, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असून, कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावत सरकारला सळो की पळो करून सोडावे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन करीत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत केलेल्या कामाबाबत त्यांनी कौतुक केले. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, शिवानंद माळी, आदींनी मनोगत व्यक्त केले. फेटा राष्ट्रवादीचा, रसद विरोधकांना!महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत, पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे, पक्षाचा सत्कार स्वीकारायचा आणि आपली सगळी रसद विरोधकांना पुरवून त्यांचा प्रचार सुरू आहे. अशा प्रवृत्तीला पायबंद घाला, असे अरुण इंगवले यांनी सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांसाठी बांध घालापंधरा वर्र्षे झाल्याने निवेदिता माने यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून थांबविल्याचा उल्लेख करीत इंगवले म्हणाले, काही मंडळी पक्षापासून दूर जात आहेत, त्यांना थांबवा, प्रसंगी त्यांच्यासाठी बांध घाला. केवळ सह्याजीराव निरीक्षक नव्हे!दिग्विजय खानविलकर यांच्या काळात सभासद नोंदणी नाही, काम शून्य, अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यातील पक्ष संपेल, असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे त्यावेळी दिला होता. जे व्हायचे तेच झाले. त्यामुळे मी केवळ सह्याजीराव (सह्या) करणारा निरीक्षक नाही, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा दिलीप पाटील यांनी दिला.