गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय शाळकरी मुलाचा खून; कोल्हापूरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 11:45 IST2021-09-09T11:34:11+5:302021-09-09T11:45:32+5:30

या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण आहे.

Murder of an 18-year-old schoolboy over a love affair with a village girl in Kolhapur | गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय शाळकरी मुलाचा खून; कोल्हापूरात खळबळ 

गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय शाळकरी मुलाचा खून; कोल्हापूरात खळबळ 

कोल्हापूर : सातवे (ता  पन्हाळा) येथील मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे (वय वर्ष 18) या शाळकरी मुलाचा गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून खून झाला. त्यास मांगले (ता.बत्तीस शिराळा) गावच्या हद्दीत जबर माराहाण झाली होती उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री मांगले गावच्या हद्दीत धनटकी परिसरात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतामध्ये घडली. 

या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण आहे. त्याचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. पण संशयित आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून नातेवाईक आंदोलन करत आहेत. रुग्णालय परिसरात गर्दी झाली आहे. शिवतेज याने गोठा प्रकल्प करून त्यात चांगला जम बसवला होता. स्थानिक राजकारणातही तो सक्रिय झाला होता.

Web Title: Murder of an 18-year-old schoolboy over a love affair with a village girl in Kolhapur