शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत हॅरिस यांचा पराभव, त्यात कोल्हापूर उत्तरचे पडसाद; सतेज पाटील यांच्या विधानांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:36 IST

कोल्हापूर : जगात कोणतीही चांगली वाईट घटना घडली की त्या घटनेचे रसरशीत विश्लेषण तत्काळ कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत होतेच. कोल्हापूरच्या ...

कोल्हापूर : जगात कोणतीही चांगली वाईट घटना घडली की त्या घटनेचे रसरशीत विश्लेषण तत्काळ कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत होतेच. कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीचा ताजा संदर्भ त्याला असतो. याला अमेरिकेचे राजकारणही अपवाद ठरले नाही. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. यात भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झाला. याच दरम्यान कोल्हापूर उत्तरमधील अर्ज माघारीच्या प्रकरणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे ‘दम नव्हता तर उभे राहायचे नव्हते ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ हे विधान राज्यभर गाजले. हाच संदर्भ घेत राज्यभरातील नेटकऱ्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या तोंडी ‘दम नव्हता तर उभारायचे नव्हतं ना मग’ हे वाक्य घालत यावर मीम्स बनवल्या. या मीम्सनी बुधवारी सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफार्मवर अक्षरश: धुमाकूळ घातला. कमला हॅरिस आणि ज्यो बायडेन हे एकाच पक्षातील आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत हॅरिस यांचा पराभव झाला. नेटकऱ्यांनी मात्र, बायडेन यांचा फोटो लावत 'दम नव्हता तर उभारायचे नव्हते ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ अशा मीम्स बनवून धुमाकूळ घातला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmericaअमेरिकाKamala Harrisकमला हॅरिसSocial Mediaसोशल मीडिया