शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका : इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:19 IST

मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत व दिलीप देसाई यांनी  पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमराठा आक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोपपालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा इशारा

कोल्हापूर : मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत व दिलीप देसाई यांनी  पत्रकार परिषदेत केला.

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातील आंदोलन लोकशाही पद्धतीने सुरू असतानाही ते पैशाचा वापर करून दिशाहीन करण्याचे काम काही सरकारपक्षीय आंदोलकांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेलाही हाताशी धरले जात आहे. पैसे देऊन आंदोलकांना फोडण्याचे कामही सुरू आहे. ही दडपशाही थांबली नाही तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला.

सावंत म्हणाले,‘ तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी वादग्रस्त संभाजी भिडे यांच्याशी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली. त्यामध्ये आंदोलकावर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा संशय आहे.

त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यावेळी वसंत मुळीक, हर्षल सुर्वे, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, गणी आजरेकर, आदी उपस्थित होते.

तोडकर यांच्यावरील कारवाई टीकेमुळेच

सचिन तोडकर यांच्यावर दहा वर्षांपूवीच्या किरकोळ गुन्ह्याबाबत ७ आॅगस्ट रोजी पकड वॉरंट काढले असताना १५ आॅगस्टला मध्यरात्री का कारवाई केली? जुना राजवाडा पोलीस हद्दीतील गुन्हा असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणला हाताशी धरून शिवाजी विद्यापीठासह इतर वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर फिरवून राजारामपुरीच्या पोलीस कोठडीत का डांबले? अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. नऊ आॅगस्टच्या मोर्चावेळी तोडकर यांनी पालकमंत्र्यांवर बोचरी टीका केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर