कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:08 IST2026-04-22T15:07:12+5:302026-04-22T15:08:20+5:30

विक्रमनगर येथे राहत्या घरी सोमवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत जुनेद गफूर पठाण (वय २१) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा बाप गफूर सुलतान पठाण (४०, दोघे रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक केली.

Kolhapur was shaken! The father played a game with his son! He murdered his addicted son and pretended to be killed in a procession. | कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव

कोल्हापूर हादरलं! बापानेच केला मुलाचा गेम! व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत दगावल्याचा बनाव

कोल्हापूर : दारूच्या नशेत घरात सर्वांना त्रास देणाऱ्या मुलाचा रागाच्या भरात चाकूने भोसकून खून केल्यानंतर तो शिवजयंतीच्या मिरवणुकीत ट्रॉलीचा पत्रा लागून दगावल्याचा बनाव बापाने केला होता. मात्र, राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत बनाव उघडकीस आणून गुन्ह्याचा उलगडा केला.

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 

विक्रमनगर येथे राहत्या घरी सोमवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत जुनेद गफूर पठाण (वय २१) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा बाप गफूर सुलतान पठाण (४०, दोघे रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक केली.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकन विक्री करणारा गफूर पठाण हा पत्नी आणि दोन मुलांसह विक्रमनगरात राहतो. त्याचा मोठा मुलगा जुनेद याला दारूचे व्यसन लागले होते. नशेत तो घरी सगळ्यांना त्रास देत होता. 

कुटुंब उद्ध्वस्त

गफूर पठाण हा चिकनची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मोठा मुलगा व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंब चिंतेत होते. मुलामध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाच्या हाताने मुलाचा खून झाला. घरातील कर्ता पुरुष पोलिस कोठडीत गेल्याने पठाण कुटुंब उद्ध्वस्त झाले. मंगळवारी सायंकाळी मुलावर अंत्यविधी केल्यानंतर बापाला अटक केली.

गुन्ह्यातील चाकू जप्त

गफुर याने खुनाची कबुली देताच पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच गुन्ह्यातील चाकू आणि रक्ताने माखलेली कपडे जप्त केली. शिवजयंतीच्या मिरवणुकीत घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा केला.

Web Title : कोल्हापुर: पिता ने नशेड़ी बेटे की हत्या की, दुर्घटना का नाटक!

Web Summary : कोल्हापुर में, एक पिता ने अपने नशेड़ी बेटे की हत्या कर दी और झूठा दावा किया कि शिव जयंती जुलूस में उसकी मौत हो गई। राजारामपुरी पुलिस ने 12 घंटे के भीतर झूठ का पर्दाफाश कर पिता को गिरफ्तार कर लिया। अपराध से परिवार तबाह हो गया है।

Web Title : Kolhapur Shaken: Father Kills Addict Son, Fakes Accident Death!

Web Summary : In Kolhapur, a father murdered his addicted son and falsely claimed he died in a Shiv Jayanti procession. Rajarampuri police exposed the lie within 12 hours, arresting the father. The family is devastated by the crime.