शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बोर्ड बनले ‘आॅनलाईन’

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

एका ‘क्लिक’वर माहिती : मुख्याध्यापक, लिपिकांना एसएमएस

संतोष मिठारी - कोल्हापूर -जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत परीक्षा, निकाल, आदींबाबतची परिपत्रके आता एका ‘क्लिक’वर मिळणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) कोल्हापूर विभागाने परिपत्रके ‘आॅनलाईन’ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पहिली पायरी म्हणून विभागाचे संकेतस्थळ डिसेंबर २०१४ पासून सुरू केले आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागीय मंडळाशी २ हजार ४०० शाळा आणि ६०० कनिष्ठ महाविद्यालये संबंधित आहेत. त्यांना परीक्षेचे अर्ज भरणे, वेळापत्रक पाठविणे, विविध बैठकांची माहिती देण्यासाठी तीन हजार परिपत्रिकांची छपाई करावी लागते. त्यानंतर संबंधित परिपत्रके पोस्टाद्वारे शाळा व महाविद्यालयांना पाठवावी लागतात. या प्रक्रियेत बराच वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. ते लक्षात घेऊन परिपत्रके आॅनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी े२२ू.ुङ्मं१‘िङ्म’ँंस्र४१.्रल्ल हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याद्वारे परिपत्रके पाठविण्यात येतील. त्यासाठी शाळांचे ई-मेल तसेच मुख्याध्यापक, लिपिकांचे मोबाईल क्रमांक संकलित केले जात आहेत. परिपत्रके आॅनलाईन पाहण्याची शाळांना सवय व्हावी यासाठी वर्षभर त्यांना ‘एसएमएस’ पाठविले जातील.


मोजक्या सूचनांची यंदा अंमलबजावणी!
दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका लवकर द्यावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. या परीक्षांसाठी महिना उरला आहे. अशा स्थितीत मंत्री तावडे यांनी केलेल्या सूचनांपैकी ज्या शक्य होतील, त्यांचीच अंमलबजावणी यंदा होणार आहे. सूचनांच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या समितीवर अवलंबून असणार आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च, तर दहावीची परीक्षा ३ मार्च ते २६ मार्चदरम्यान होणार आहे. प्रश्नपत्रिकांची छपाई पूर्ण झाली असून, केंद्राची निश्चिती, संचालक, शिक्षक, आदींच्या बैठकींची तयारी शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. शिक्षक विद्यार्थी सराव, पूर्वपरीक्षा तसेच प्रात्यक्षिकांच्या तयारीत गुंतले आहे. यातच शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये विविध सूचना सुचविल्या आहेत.
यातील घराजवळील परीक्षा केंद्र देणे यंदा प्रत्यक्षात शक्य होणार नसल्याचे परीक्षाविषयक तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधित काही लोकांनी सांगितले. शिवाय, प्रश्नपत्रिका दहा मिनिटे आधी देण्याची अंमलबजावणी करता येईल. पण, विद्यार्थांना आणखी किमान अर्धा तास वर्गात घ्यावे लागणार आहे. त्याचा परिणाम पेपरचा कालावधी वाढण्यावर होणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.


यापूर्वी परिपत्रके पाठविण्यात बराच वेळ लागायचा; त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना याबाबत काही शंका, अडचणी असल्यास त्यांच्या सोडवणुकीसाठी विलंब होत होता. शिवाय एक परिपत्रक पाठविण्यास किमान दहा रुपयांचा खर्च व्हायचा. वर्षभरात विभागाचा परिपत्रकांवरील खर्च लाखोंच्या घरात पोहोचत होता. सर्वच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे परिपत्रके आॅनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया सुरू होईल.
- शरद गोसावी, सचिव, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ

शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या सूचना विद्यार्थिहिताच्या आहेत. संबंधित सूचना शिक्षण मंडळाच्या विविध समित्यांसमोर ठेवण्यात येतील. त्यातील निर्णयानुसारच या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. परीक्षांसाठी अवघा महिना राहिला आहे. त्यामुळे समितीची बैठक लवकरच घेण्यात येईल. त्यातील निर्णय लवकरच जाहीर केले जातील.
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य मा.व उ.मा.शिक्षण मंडळ