शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

कर्नाटक पोलिसांची कोगनोळी नाक्यावर आरेरावी; महाराष्ट्राची अत्यावश्यक सेवाही अडविली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:24 PM

आडमुठेपणामुळे सीमाभागात संताप

- दत्तात्रय पाटील

म्हाकवे/कोल्हापूर- कोरोनाच्या पाश्वभुमीवर कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांकडून नाकाबंदी केली आहे. मात्र,महाराष्ट्रातून येणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, सेवेवर रुजू होण्यासाठी जाणारे डॉक्टर, औषध विक्रेते यांचीही अडवणूक केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांत याबाबत संतापाची लाट उसळली असून याचे पडसाद म्हाकवे(ता.कागल)सीमारेषेवर उमटत आहेत.येथे कर्नाटकातील एकाही  नागरिकाला आत येवू दिले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा ज्वोर बाजूलाच राहिला असून महाराष्ट्र-कर्नाटक असा नवाच वाद निर्माण झाला आहे. यामध्ये सीमावासीयांची कोंडी होत आहे.

म्हाकवे परिसरातील नागरिकांना कागलकडे जाण्यासाठी आप्पाचीवाडी मार्गे कोगनोळी टोलनाक्यावरून जावे लागते.मात्र,आज म्हाकवेतून गडमुडशिंगीकडे जाणारे औषध विक्रेते अभिजित पाटील, मुरगुड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, तसेच सेक्युरिटी साठी जाणारे कर्मचारी यांना कोगनोळीतून परतून लावले.त्यांनी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेले पुरावे, ओळखपत्रे दाखविली तरीही कर्नाटक पोलिसांनी आडमुठेपणा सोडला नाही.त्यामुळे संतप्त म्हाकवे ग्रामस्थांनी सीमाभागातील भाटनांगनूर, हदनाळ, आप्पाचीवाडी,कुर्ली येथिल वाहनधारकांची अडवूक केली. ही गावे औषध, किराणा मालासाठी म्हाकवे गावावरच विसंबून आहेत.हा वाद वाढण्यापुर्वी प्रशासनाने समझोता करणे आवश्यक आहे.

किती हा आडमुठेपणा....

कोगनोळीतील अडवणूकीच्या कारणावरून म्हाकवेत किराणा,औषधे नेण्यासाठी आलेल्या भाटनांगनूर(ता.चिक्कोडी) येथिल नागरिकांना अडविले. यावेळी या नागरिकांनी निपाणी पोलिसांना फोन केला. मात्र,निपाणी पोलिसांनी तुम्ही महाराष्ट्रात जावू नका असा सल्ला दिला.मात्र,या नागरिकांना म्हाकवे हे एक किमी वरील सोयीचे ठिकाण सोडून निपाणीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि संचारबंदीमुळे बिचारे हे नागरिक तिकडे जावू शकत नाहीत.त्यामुळे दोन राज्याच्या वादात सीमाभागातील सामान्य नागरिक भरडला जाणार आहे.  "कर्नाटकात आपल्या नागरिकांची अशी अडवणूक होत असेल तर नाईलाजाने आम्हालाही त्यांची अडवणूक करावी लागेल. याबाबत आज(सोमवारी) कर्नाटक प्रशासनाशी आपण चर्चा करणार असून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. दत्तात्रय नाळ, पोलिस निरीक्षक,कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस