शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? सीबीआयनं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
7
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
8
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
9
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
10
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
11
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
12
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
13
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
14
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
15
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
16
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
17
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
18
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
19
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
20
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
Daily Top 2Weekly Top 5

घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:16 IST

Nashik Malegaon Diphtheria Death News: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात घटसर्प या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मालेगाव शहरात घटसर्प या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आरोग्य प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर गेले असून नागरिकांना तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाला विरोध होत असल्याने आरोग्य प्रशासन चिंतेत आहे. आरोग्य विभागाने मालेगावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि ताप, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, घटसर्प आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे काय आहेत? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

मृत मुलांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी दोन्ही मुलांमध्ये घटसर्प गंभीर आजाराची लक्षणे आढळून आली. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.  या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाने नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घटसर्पापासून संरक्षण मिळवण्यासाठी बालपणात दिली जाणारी डीपीटी लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहे. या लसीमध्ये डिफ्थेरिया, कुक्कुरखोकला आणि टिटॅनसपासून संरक्षण मिळते. मात्र, काही भागांत लसीकरणाबाबत गैरसमज आणि विरोध असल्याने आरोग्य प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता मुलांचे वेळेवर लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

घटसर्प म्हणजे नेमका कोणता आजार?

घटसर्प हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य जीवाणुजन्य आजार आहे. हा आजार कॉरीनेबॅक्टेरियम डिफ्थेरीयानावाच्या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूमुळे घसा आणि नाकाच्या भागावर गंभीर परिणाम होतो. विशेष म्हणजे, हे जिवाणू शरीरात विषारी द्रव्य तयार करतात. हे विष रक्ताद्वारे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचते आणि हृदय, मूत्रपिंड तसेच मज्जासंस्थेवर गंभीर दुष्परिणाम करतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

घटसर्प आजाराचा प्रसार कसा होतो?

घटसर्पाचा संसर्ग बाधित व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकल्याने हवेद्वारे पसरतो. तसेच, रुग्णाने वापरलेल्या वस्तूंचा वापर केल्यानेही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि संशयित लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

उपचार कसे केले जातात?

घटसर्पाची लागण झाल्याचा संशय आल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक असते. या आजारावर प्रतिजैविके आणि डिफ्थेरिया अँटीटॉक्सिनच्या मदतीने उपचार केले जातात. वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, हा आजार जनावरांना देखील होतो. मात्र, जनावरातील घटसर्प वेगळा असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Diphtheria outbreak in Malegaon: Two children die, administration on alert.

Web Summary : Two children died in Malegaon due to diphtheria. Health officials are urging vaccination amidst resistance. Diphtheria, a bacterial infection, affects the throat and can be fatal. Early treatment with antitoxins and antibiotics is crucial. Awareness and vaccination are key to prevention.
टॅग्स :MalegaonमालेगांवNashikनाशिकHealthआरोग्य