Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:50 IST

1 / 10
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ज्वालाने उचललेल्या एका कौतुकास्पद पाऊलामुळे सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे.
2 / 10
ज्वाला आई झाली असून तिने सरकारी रुग्णालयात तब्बल ६० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे. बॅडमिंटनच्या मैदानात देशासाठी कित्येक पदके जिंकणाऱ्या ज्वालाने आता चिमुकल्या जीवांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
3 / 10
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत, आई बनण्याचा गेल्या एका वर्षाचा प्रवास किती प्रभावी आणि अर्थपूर्ण राहिला आहे, हे ज्वाला गुट्टाने सांगितलं आहे. ती अनेक नवजात बाळांसाठी देवदूत ठरली आहे.
4 / 10
ज्वालाने माहिती दिली की, तिने आतापर्यंत चेन्नई आणि हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयांमध्ये ६० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे. ती सुरुवातीपासूनच इतर मातांनाही ब्रेस्ट मिल्क दान करण्यासाठी जागरूक आणि प्रोत्साहित करत आहे.
5 / 10
२०२५ मध्ये एका गोड मुलीला जन्म दिला. आपल्या एक्स अकाऊंटवर ब्रेस्ट मिल्कच्या पाकिटांचा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, 'मी एका वर्षाच्या आत ६० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे.'
6 / 10
'याने काय फरक पडतो? तर १०० मिलीलीटर दुधाचं दान एका किलो वजनाच्या लहान बाळाला अनेक दिवसांपर्यंत पुरू शकतं. हे दान न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (NICU) मध्ये असलेल्या अनेक बालकांसाठी जीवनदान ठरू शकतं.'
7 / 10
ज्वालाने पुढे सांगितलं की, एनआयसीयू (NICU) मध्ये ठेवलेल्या नवजात बालकांसाठी आईचं दूध अत्यंत आवश्यक असतं. अनेकदा गर्भधारणेतील कॉम्प्लिकेशन्स, मानसिक ताण आणि प्री-मॅच्युअर डिलिव्हरी यामुळे मातांना पुरेसे दूध येत नाही.'
8 / 10
'सुरुवातीच्या दिवसांत आईचे दूध मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. दान केलेलं हे दूध बाळांमधील 'नेक्रोटाइजिंग एंटरोकोलाइटिस' (पोटाचा एक गंभीर आजार) सारख्या घातक आजारांच्या घटना लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरलं आहे.'
9 / 10
तुम्ही यामध्ये कशी मदत करू शकता हे जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक रुग्णालयाशी संपर्क साधा आणि चौकशी करा असं देखील ज्वालाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
10 / 10
महिला खेळाडूने उचललेलं हे पाऊल खरोखरच प्रेरणादायी आहे. आईचं दूध लहान बाळांसाठी अमृतासारखं असतं. आईच्या दूधात मुलाच्या वाढीसाठी सर्व आवश्यक पोषक तत्वं असतात. यामुळे मुलांमध्य विविध आजारांचा धोका कमी होतो.
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टीदूध